Same-Sex Marriage Legal in Thailand Dainik Gomantak
ग्लोबल

Same-Sex Marriage Legal: आणखी एका देशात समलिंगी विवाहाला मान्यता, पंतप्रधानांनी केली घोषणा!

Same-Sex Marriage Legal in Thailand: समलिंगी विवाहाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

Same-Sex Marriage Legal in Thailand: समलिंगी विवाहाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. समलिंगी विवाहाबाबत भारतात इतका संघर्ष सुरु असताना, एका देशाच्या सरकारने समलिंगी विवाहाला मान्यता दिली आहे.

थायलंड सरकारने नागरी संहितेत बदल करण्याचे मान्य केले आहे. नागरी संहितेत बदल केल्यानंतर थायलंडमध्ये समलिंगी विवाह कायदेशीर होईल. थायलंड सरकारच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी ही माहिती दिली. देशाच्या सरकारने समलैंगिक विवाह विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती मंत्रिमंडळाने दिली.

12 डिसेंबरला संसदेत विधेयक मांडले जाणार आहे

दरम्यान, समलिंगी विवाह विधेयकाचा मसुदा पुढील महिन्यात खासदारांसमोर मांडला जाऊ शकतो, असे मंत्रिमंडळाने सांगितले. थायलंडच्या (Thailand) पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी सांगितले की, 12 डिसेंबर रोजी हे विधेयक खासदारांसमोर मांडले जाण्याची अपेक्षा आहे. जर हे विधेयक संसदेने मंजूर केले आणि त्याला राजाची संमती मिळाल्यास, तैवान आणि नेपाळसह थायलंड हा समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा एकमेव आशियाई देश बनेल.

भारतात समलैंगिक विवाहावरुन संघर्ष

दुसरीकडे, भारतात (India) समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. या प्रकरणाची शेवटची सुनावणी 16 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात झाली होती.

ज्यात सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत म्हटले होते की, 'संसद यासंदर्भात कायदा करु शकते.' मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एस के कौल, एसआर भट्ट, हिमा कोहली आणि पीएस नरसिम्हा यांचा समावेश असलेल्या खंडपीठात सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की, भारत ही विवाह-आधारित संस्कृती आहे आणि एलजीबीटी जोडप्यांना आर्थिक, बँकिंग आणि विमा समस्यांसाठी विषमलिंगी जोडप्यासारखेच अधिकार दिले जावेत. तसेच वारसा, वारसाहक्क आणि अगदी दत्तक आणि सरोगसी यांसारख्या बाबींमध्येही अधिकार दिले पाहिजेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT