Salman Rushdie Attacked Dainik Gomantak
ग्लोबल

Salman Rushdie यांच्या प्रकृतीत सुधारणा, प्राणघातक हल्ल्यानंतर मोठी शस्त्रक्रिया यशस्वी

मिळालेल्या माहितीनुसार सलमान रश्दी यांना आता व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Salman Rushdie Health Update: न्यूयॉर्कमधील प्राणघातक हल्ल्यानंतर जगातील प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी सलमान रश्दी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना आता व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे.

गंभीर जखमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रश्दी यांच्या शरीरावर चाकूने हल्ला केल्याच्या अनेक खुणा होत्या. हल्ल्यानंतर रश्दी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सलमान रश्दी शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात व्याख्यान देण्यासाठी पोहोचले होते, त्यावेळी त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला.

सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे

इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध लेख सलमान रश्दी अजूनही गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती थोडी सुधारली आहे. एपी या वृत्तसंस्थेनुसार, आता त्यांना व्हेंटिलेटरमधून बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते आता काहीतरी बोलू शकत आहे. सहकारी लेखक आतिश तासीर यांनी संध्याकाळी ट्विट केले की ते व्हेंटिलेटरमधून बाहेर आले आहेत आणि बोलत आहेत. रश्दी यांनी संभाषणात काही विनोदही केल्याचे तासीर यांनी सांगितले.

हल्ला कोणी केला?

लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती न्यू जर्सी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात ते व्याख्यान देणार होते, तेव्हा एका व्यक्तीने स्टेजवर चढून लेखकाला धक्काबुक्की केली आणि चाकूने हल्ला केला. पोलिसांनी हल्लेखोराची ओळख हदी मातर अशी केली आहे. त्याचे वय 24 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूने वार केल्यानंतर हादी मातरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

Vellim Church Attack: 13 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल! वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

Rohit Arya Shot Dead : मुंबईतील RA स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य गोळीबारात ठार

SCROLL FOR NEXT