India Most Wanted Terrorist Sajid Mir Poisoned In Pakistan Jail Dainik Gomantak
ग्लोबल

Most Wanted Terrorist: पाकिस्तानच्या तुरुंगात केलं विष प्राशन; कोण आहे भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी?

India Most Wanted Terrorist Sajid Mir: साजिद मीरला 26/11 च्या मुंबई हल्ल्यासाठी लष्कर-ए-तैयबा (LET) चे 'प्रोजेक्ट मॅनेजर' म्हणून लिस्टिड केले होते.

Manish Jadhav

India Most Wanted Terrorist Sajid Mir Poisoned In Pakistan Jail: 26/11 ही भारताच्या इतिहासातील ती तारीख आहे, जी कोणीही भारतीय जिवंत असेपर्यंत विसरु शकत नाही. मुंबई हल्ल्याच्या जखमा आजही देशातील सर्वसामान्यांना वेदना देत आहेत. दरम्यान, भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी साजिद मीर याने पाकिस्तानच्या तुरुंगात विष प्राशन केल्याची बातमी पाकिस्तानातून आली आहे. चला तर मग साजिद मीरबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

कोण आहे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी साजिद मीर?

भारत सरकारच्या अधिकृत दस्ताऐवजांनुसार, साजिद मीरला 26/11 च्या मुंबई हल्ल्यासाठी लष्कर-ए-तैयबा (LET) चे 'प्रोजेक्ट मॅनेजर' म्हणून लिस्टेड केले होते. तर दुसरीकडे, साजिद मीरला 2023 मध्ये पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादी वित्तपुरवठा केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. ही शिक्षा मुख्यतः पाकिस्तानने स्वतःला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्यासाठी एक पाऊल म्हणून पाहिले होते. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाईंड म्हणून अमेरिकेने चिन्हित केलेल्या साजिद मीरला दोषी ठरवणे, ही मीरच्या विरोधात पाकिस्तानने केलेली सर्वात महत्त्वपूर्ण कारवाई होती.

चीनने भारताविरोधात अनेक प्रयत्न केले

यापूर्वी, चीन सरकारने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांवर बंदी घालण्यासाठी भारत आणि इतर देशांनी UNSC मध्ये आणलेले अनेक ठराव थांबवले होते. पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड मसूद अझहरवर UNSC मध्ये निर्बंध लादण्याच्या नवी दिल्लीच्या वारंवार प्रयत्नांना रोखण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे असेच ''टेक्निकल स्टॉप' वापरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI: 'इफ्फीसाठी गोव्यात येणे म्हणजे नवीन शिकण्याजोगे'! प्रसिद्ध दिग्दर्शक अलींचे गौरवोद्गार; सिनेमात जग बदलण्याची क्षमता असल्याचे मांडले मत

Goa Opinion: गोव्यातल्या वाढत्या दरोड्यांमुळे लोकांच्यात वाढलेली भीती, पोलिसांच्या बदल्या; वरवरचे बदल करून काय साध्य होणार?

Rama Kankonkar: "मी माहिती दिली, आता त्या 2 राजकारण्यांची चौकशी करा!", हल्ला प्रकरणी रामा काणकोणकर यांची पोलिसांकडे थेट मागणी

IFFI 2025: 'इफ्फी'च्या कार्यक्रमस्थळी गोमंतकीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार दिसायला हवे होते; परंतु चित्र मात्र अगदीच वेगळे..

Stray Dogs: शाळेच्या आवारात कुत्र्यांना खायला घालू नका! दुर्घटना टाळण्यासाठी निर्देश; विद्यालयांना कुंपण उभारण्याची सूचना

SCROLL FOR NEXT