America Dainik Gomantak
ग्लोबल

7 वर्षात 38 देशांचा प्रवास; प्रेयसीच्या मृत्यूच्या दु:खात कुत्र्यासोबत केला पायी विश्वविक्रम

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहणाऱ्या टॉम टर्कीचने आपल्या कुत्र्यासोबत पायी प्रवास करून 38 देशांची सैर केली आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेतील (America) न्यू जर्सी येथे राहणाऱ्या टॉम टर्कीचने आपल्या कुत्र्यासोबत पायी प्रवास करून 38 देशांची सैर केली आहे. सात वर्षांच्या प्रवासात टॉमसोबत आलेल्या डॉग सवानाने विश्वविक्रम केला आहे. सुमारे 48 हजार किमीच्या प्रवासात टॉम टर्किचला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण त्याने आपला प्रवास कुठेच थांबवला नाही. टॉम टर्किच सांगतात की, त्याने हा प्रवास पाच वर्षांत पूर्ण केला असता, पण कोरोना महामारी आणि स्वत:च्या आजारामुळे त्याला प्रवास पुर्ण करण्यासाठी आणखी दोन वर्षे लागली. (Saddened by the death of his beloved he set a world record)

टॉमच्या चालत प्रवास करण्यामागे देखील कारण आहे आणि ज्यामुळे त्याला प्रवासात प्रेरणा मिळाली आहे. खरेतर टॉमची गर्लफ्रेंड मेरी 2006 मध्ये एका अपघातात मरण पावली. आणि त्यामुळे टॉम एकटा पडला. टॉमला वाटले की आयुष्य छोटे आहे, त्याने ठरवले की, जगाचा प्रवास करायचा. टॉमने निधी उभारण्यास सुरुवात केली, कॉलेजमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करत असताना टॉमने दोन वर्षांच्या प्रवासासाठी त्याने पैसे गोळा केले.

26व्या वाढदिवशी हा प्रवास सुरू केला

या प्रवासामध्ये त्याने अनेक चढउतार पाहिल्याचे टॉम सांगतो. तुर्की-उझबेकिस्तानमध्ये, लोकांनी टॉमला लग्नासाठी आमंत्रित केले आणि आनंद दिला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड धारक न्यूमनच्या कथेने प्रेरित होऊन टॉमने जगाचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे टॉमच्या या प्रवासाचा गिनीज रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला नसून, पायी असा प्रवास करणारा त्याचा कुत्रा पहिला प्राणी ठरला आहे.

टॉम-सवाना दररोज सुमारे 40 किमी प्रवास करतात

टॉम आणि सवाना दररोज सुमारे 30 ते 40 किमी चालत असतात आणि रात्र कॅम्पमध्ये घालवतात. टॉम म्हणतो की या प्रवासात सावनाने त्याला खूप साथ दिली आहे. टॉमपेक्षा सावनामध्ये जास्त ऊर्जा असायची आणि त्याने या प्रवासासाठी खूप उत्साहही दाखवला, तसेच सुरक्षा देखील होत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT