S Jaishankar Meeting with Italian Foreign Minister Luigi Di Maio  Dainik Gomantak
ग्लोबल

इटलीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली एस जयशंकर यांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

भारत दौऱ्यावर असलेले इटलीचे परराष्ट्र मंत्री लुइगी डी मायो यांनी शुक्रवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, हरित ऊर्जा यासह इतर विषयांवर चर्चा झाली.

दैनिक गोमन्तक

S Jaishankar Meeting with Italian Foreign Minister Luigi Di Maio : भारत दौऱ्यावर असलेले इटलीचे परराष्ट्र मंत्री लुइगी डी मायो यांनी शुक्रवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, हरित ऊर्जा यासह इतर विषयांवर चर्चा झाली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, इटलीचे परराष्ट्र मंत्री लुइगी डी मेयो यांचे त्यांच्या पहिल्या भारत भेटीवर स्वागत करताना आनंद होत आहे. इटलीचे परराष्ट्र मंत्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यात्रेच्या सुरुवातीला त्यांनी गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बेंगळुरू येथे भेट घेतली. (S Jaishankar Meeting with Italian Foreign Minister Luigi Di Maio)

एस जयशंकर यांनी या भेटीचे फोटोसह ट्विट केले आहे. त्यामध्ये "इटलीचे परराष्ट्र मंत्री लुइगी डी मायो यांच्याशी सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक बैठक झाली. सायबर सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञानासह अंतराळ क्षेत्रातील आमच्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केली. 'मेक इन इंडिया'मध्ये इटालियन कंपन्यांचे वाढते स्वारस्य, तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणामुळे आमचे द्विपक्षीय संबंध आणखी वाढतील" असे लिहिले आहे. लुइगी डी मेयो हे 4 ते 6 मे या कालावधीत भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत उच्चस्तरीय अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळही आले आहेत.

इटलीचे परराष्ट्र मंत्री मायो यांनी गुरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बंगळुरू येथे भेट घेतली. तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले होते की, इटालियन परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही बाजूंना त्यांच्या द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण स्पेक्ट्रमवर चर्चा करण्याची आणि प्राधान्य क्षेत्रातील त्यांचे जवळचे संबंध वाढवण्याची संधी मिळेल. दोन्ही बाजूंमधील चर्चेत विशेषत: गुंतवणूक कनेक्टिव्हिटी, संरक्षण आणि सुरक्षा, स्वच्छ आणि हरित ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य यासारख्या क्षेत्रांचा समावेश असेल. त्यात म्हटले आहे की जयशंकर आणि डी मेयो नोव्हेंबर 2020 मध्ये डिजिटल पद्धतीने सादर केलेल्या 'कृती योजना 2020-24' च्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेतील आणि समान हिताच्या प्रादेशिक आणि बहु-स्तरीय विषयांवर चर्चा करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT