Russia's President Vladimir Putin declare support for Taliban government  Dainik Gomantak
ग्लोबल

चीन आणि पाकिस्ताननंतर रशियाचाही तालिबान सरकारला पाठिंबा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन(Vladimir Putin) यांनी असे सांगितले आहे की रशियाला तालिबानसोबत काम करावे लागेल.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानने (Taliban) पुन्हा सत्ता स्थापन केल्यांनतर , जगातील असे अनेक देश आहेत जे तालिबान सरकारला (Taliban Government) मान्यता देत नाहीत, तर काही देश तालिबानशी चांगले संबंध ठेवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.आणि नव्या सरकारला मान्यता देण्यासाठी आग्रही देखिल आहेत. चीन (China) आणि पाकिस्ताननंतर (Pakistan)आता रशियानेही (Russia) तालिबानशी सकारात्मक संबंध ठेवण्यास सुरू केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन(Vladimir Putin) यांनी असे सांगितले आहे की रशियाला तालिबानसोबत काम करावे लागेल. चीन आणि रशिया यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा गट शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीत पुतीन यांनी हे सांगितले आहे. (Russia's President Vladimir Putin declare support for Taliban government)

ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे झालेल्या परिषदेत पुतिन यांनी व्हिडीओ लिंकच्या मदतीने भाषण केले.या भाषणात पुतिन म्हणाले की, रशियाने अफगाणिस्तानला संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये पाठिंबा दिला असून याशिवाय जगातील प्रभावशाली देशांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती स्थिर करण्याचाही विचार करावा अशी विनंती देखील केली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की चीननंतर रशिया हा एक शक्तिशाली देश आहे ज्याने आता तालिबानला उघडपणे समर्थन दिले आहे.

तालिबानशी संबंध चीन आणि रशियासाठी महत्त्वाचे ठरू शकतात

असे मानले जाते की अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या माघारीनंतर चीन आणि रशिया या देशात स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू शकतात. चीनने यासाठी आधीच पुढाकार घेतला आहे. युरोप आणि आशियामध्ये आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी चीन आपल्या बेल्ड अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. याचाच एक भाग आहे चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर.

अलिकडच्या वर्षांत इराण, रशिया, ताजिकिस्तान सारख्या देशांनी या व्यापारी नेटवर्कमध्ये स्वारस्य दाखवले आहे, परंतु अमेरिकेच्या व्याप्यामुळे अफगाणिस्तान या प्रकल्पाचा भाग बनू शकला नाही. आता अमेरिका गेल्यानंतर चीनला आशा आहे की तालिबानसोबत मिळून तो आपला प्रकल्प पूर्ण करू शकेल. तथापि, यात चीनसाठीही अनेक आव्हाने असणार आहेत.

जर आपण रशियाबद्दल बोललो तर मध्य आशियातील देशांमध्ये अमेरिकन सैन्याची उपस्थिती संपल्यानंतर त्याचा अफगाणिस्तानमध्ये प्रभाव वाढू शकतो. अफगाणिस्तानात अफाट खनिज संसाधनांची उपस्थिती देखील एक मोठा घटक असू शकतो. काबूलमधील रशियन मुत्सद्यांनी तालिबानचे वर्णन हे सर्व सामान्य लोक आहेत असे यापूर्वीच केले होते. त्याचबरोबर अफगाणिस्तानची राजधानी आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहे असे विधान देखील केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घरदुरुस्ती, विभाजन प्रक्रिया सोपी होणार; 'माझे घर' योजनेमुळे मयेवासीयांना मिळणार घरांचा मालकी हक्क

VIDEO: ट्रम्प यांचे भाषण सुरु असतानाच इस्रायली संसदेत राडा, 'पॅलेस्टाईनला मान्यता द्या'चे झळकले पोस्टर, घटनेचा व्हिडिओ व्हायरल!

गोव्याचे मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री अडचणीत सापडणार? रामा काणकोणकरांच्या आरोपानंतर मारहाण प्रकरणाचा तिढा वाढला

Viral Video: "अपघात झाला तेव्हाच पठ्ठ्याला जाग आली", ट्रक अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल; नेटकरीही चकीत, म्हणाले...

IND vs WI 2nd Test: 12 वर्षांत पहिल्यांदाच! फॉलोऑननंतरही वेस्ट इंडीज संघाने केली कमाल, भारताविरुद्ध रचला धावांचा डोंगर; कॅम्पबेल चमकला VIDEO

SCROLL FOR NEXT