NSA Ajit Doval Dainik Gomantak
ग्लोबल

India-Russia Ties: वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर 'या' रशियन अधिकाऱ्याचा अजित डोभाल यांना फोन, जगात एकच खळबळ!

Ajit Doval Speaks to Nikolai Patrushev: रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव यांनी बुधवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली.

Manish Jadhav

Russia-News: रशियातील वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दरम्यान, रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव यांनी बुधवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. निकोलाई यांनी डोभाल यांना रशियातील ताज्या घडामोडींची माहिती दिली.

घटनांची माहिती

भारत आणि रशियाच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा अशा वेळी झाली, जेव्हा काही दिवसांपूर्वी रशियाला वॅगनर ग्रुप या खासगी लष्करी गटाच्या बंडखोरीला सामोरे जावे लागले होते. रशियाच्या (Russia) निवेदनानुसार, पात्रुशेव यांनी डोभाल यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

यावेळी त्यांनी डोभाल यांना रशियामधील ताज्या घडामोडींची माहिती दिली. निवेदनानुसार, "द्विपक्षीय आणि बहुपक्षीय स्वरुपाच्या चौकटीत, सुरक्षा क्षेत्रातील रशिया-भारत सहकार्याशी संबंधित सद्य समस्या आणि त्याच्या संभाव्यतेच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली."

याशिवाय, एन पात्रुशेव यांनी डोभाल यांना रशियातील ताज्या घडामोडींची माहिती दिली. विशेष म्हणजे, येवगेनी प्रिगोझिन यांच्या नेतृत्वाखालील वॅगनर ग्रपने गेल्या शनिवारी बंड केले आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आव्हान दिले.

तथापि, जेव्हा त्यांचे सैन्य मॉस्कोपासून केवळ 200 किलोमीटर (120 मैल) दूर होते, तेव्हा प्रीगोझिनने आपले सैनिक मागे घेण्याचा निर्णय घेतला. प्रिगोझिनने अचानक क्रेमलिनशी करार केल्यानंतर माघार घेण्याचा आपला इरादा जाहीर केला.

वॅग्नरने पुतीन यांना धक्का दिला

वॅगनर ग्रुपने पुतीन यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. वॅगनर ग्रुपने युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध लढण्यास नकार दिला आहे. प्रीगोझिनच्या नेतृत्वाखाली वॅग्नरच्या सैन्याने गेल्या आठवड्यात रशियाचे दक्षिणेकडील शहर रोस्तोव ताब्यात घेतले होते.

त्यानंतर पुतिन यांची सत्ता उलथून टाकली जाईल, असे बोलले जात होते. त्यानंतर खुद्द पुतीन यांनाच स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे यावे लागले. गद्दारांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT