Alexander Dugin | Vladimir Putin  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: युद्ध एकतर रशिया जिंकेल, नाहीतर जगाचा नाश होईल... पुतिन यांच्या गुरूचा दावा

कोणत्याही परिस्थितीत रशिया पराभव स्विकारणार नाही याची खात्री

Akshay Nirmale

Russia-Ukraine War: गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचा शेवट काही दिसून येत नाही. इतर देशांच्या मदतीमुळे युक्रेन चिवटपणे रशियाविरोधात लढा देत आहे. तथापि, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या एका निकटवर्तियाने नुकतेच एक गंभीर वक्तव्य केले आहे. हे युद्ध एकतर रशिया जिंकेल, नाही जिंकले तर जग नष्ट होईल, असा दावा या पुतिन यांच्या निकटवर्तियाने केला आहे.

(Alexander Dugin On War)

पुतिन यांचा ब्रेन मानल्या जात असलेले अलेक्झांडर दुगिन यांनी हे वक्तव्य केले आहे. भारतीय खासगी न्यूज चॅनेल TV 9 भारतवर्षला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. दुगिन म्हणाले की, "या युद्धाबाबत दोनच शक्यता आहेत. पहिली शक्यता म्हणजे जेव्हा आम्ही जिंकू तेव्हा युद्ध संपेल. जरी हे युद्ध फार सोपे नसले तरी. आणि दुसरी शक्यता अशी आहे की जर रशिया जिंकणार नसेल तर ही लढाई जगाच्या अंतासह संपेल. एकतर आम्ही जिंकू, किंवा जगाचा नाश होईल."

दुगिन म्हणाले, मला खात्री आहे की रशिया कोणत्याही परिस्थितीत शत्रूकडून पराभव स्वीकारणार नाही. युद्धाच्या शेवटी विजयाशिवाय दुसरा कोणताही पर्याय आम्ही सहन करणार नाही आणि यासाठी आमचे सर्व नागरिक, आमचा देश, आमचे राष्ट्राध्यक्ष यांची पुर्ण सहमती आहे.

या युद्धकाळात काही दिवसांपुर्वी एका कार बॉम्बस्फोटात दुगिन यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. हा स्फोट दुगिन यांना मारण्यासाठी घडवून आणण्यात आला होता, असे समजते. या स्फोटामागे युक्रेनियन दहशतवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. जर दहशतवाद्यांना मुलीऐवजी मला मारायचे असते तर मला दोनदा मरायला आवडले असते, असेही दुगिन म्हणाले होते.

ते म्हणाले की, हे युद्ध रशिया आणि युक्रेनमध्ये नाही. हे दोन देशांमधील किंवा रशिया आणि पश्चिमात्य देश यांच्यातील लढ्याबद्दल नाही. हा संघर्ष मनुष्य आणि वाईट ताकद यांच्यात आहे. माझा माझ्या देशाला, माझ्या राष्ट्राध्यक्षांना पाठिंबा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT