रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. यातच आता, एक रशियातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाचे एक मालवाहू विमान मंगळवारी कोसळले. रिपोर्टनुसार, विमानात 15 लोक होते आणि या सर्वांचा अपघाती मृत्यू झाला. मॉस्कोच्या ईशान्येकडील इव्हानोवो भागात ही घटना घडली. विमान (Ilyushin Il-76) पश्चिम रशियातील विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही वेळातच क्रॅश झाले. रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकऑफ दरम्यान इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाला.
रिपोर्टनुसार, विमानात 8 क्रू मेंबर्स आणि 7 प्रवासी होते. या दुर्घटनेत कोणीही वाचले नसल्याची माहिती रशियन ऑनलाइन मीडियाने दिली आहे. मॉस्को टाईम्सने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. विमानाला आग लागल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. विमानाच्या इंजिनला आग लागली असून ते खाली कोसळताना दिसत आहे.
अमेरिकेतील (America) व्हर्जिनियाच्या ग्रामीण भागातील एका छोट्या विमानतळाजवळ रविवारी दुपारी एक खाजगी विमान कोसळून जळून खाक झाले आणि त्यात विमानातील सर्व पाच जण ठार झाले होते.
व्हर्जिनिया पोलिसांनी एका निवेदनात म्हटले होते की, ट्विन-इंजिन IAI Astra 1125 हॉट स्प्रिंग्समधील विमानतळ रस्त्याजवळील झाडांवर आदळले, ज्यात एका लहान मुलासह पायलटबरोबर चार जणांचा मृत्यू झाला. दुपारी 3 च्या सुमारास क्रॅश झाल्यानंतर बाथ काउंटीमधील क्रॅशला पोलीस आणि इतर आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला. पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान क्रॅश होऊन खाली पडल्याने आग लागली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.