Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: 'हो' म्हणशील ना? 1454 फूट उंचीवर तरुणाने प्रेयसीला केलं प्रपोज; रोमँटिक क्षणाचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Russian Couple Viral Video: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असलेल्या जगातील सर्वात प्रसिद्ध आणि उंच इमारतींपैकी एक असलेल्या 'एम्पायर स्टेट बिल्डिंग'वर एका रशियन जोडप्याने केलेल्या धोकादायक स्टंटमुळे जगभरात खळबळ उडाली.

Manish Jadhav

Russian Couple Viral Video: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असलेल्या जगातील सर्वात प्रसिद्ध आणि उंच इमारतींपैकी एक असलेल्या 'एम्पायर स्टेट बिल्डिंग'वर एका रशियन जोडप्याने केलेल्या धोकादायक स्टंटमुळे जगभरात खळबळ उडाली. कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय हे जोडपे थेट या गगनचुंबी इमारतीचा सर्वात वरचा सुळका म्हणजेच 1454 फूट उंचीवर चढले. भरदिवसा घडलेल्या या थरारक प्रकारामुळे इमारतीच्या 'ऑब्झर्वेशन डेक'वर उपस्थित असलेल्या पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. इमारतीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर या दोघांनी तिथे सुमारे 30 मिनिटे घालवली.

एवढचं नाहीतर त्यांनी एका काळ्या कापडावर पांढऱ्या अक्षरात "जेव्हा प्रेमाची शक्ती ही सत्तेच्या हव्यासावर विजय मिळवते, तेव्हाच जगात शांतता निर्माण होते," असा संदेश लिहिलेला बॅनर तिथे फडकवला.

इवान कुझनेत्सोव (वय 32) आणि अँजेलिना निकोलाऊ (वय 33) अशी या रशियन जोडप्याची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, इतक्या अंगावर काटा आणणाऱ्या उंचीवर आणि पोलिसांच्या ताब्यात जाण्यापूर्वी इवानने अँजेलिनाला लग्नासाठी प्रपोज केले. या संपूर्ण थरारक स्टंटचा आणि प्रपोजलचा व्हिडिओ देखील त्यांनी वरुन शूट केला, जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या दोघांनीही काळे कपडे घातले होते आणि स्वतःचे चेहरे मास्कने झाकले होते. सुरक्षिततेची कोणतीही यंत्रणा सोबत नसताना हे दोघे इमारतीच्या सुरक्षेला चकवा देऊन इतक्या उंचीवर नेमके कसे पोहोचले, याचा तपास आता न्यूयॉर्क पोलीस करत आहेत.

इमारतीवरुन खाली उतरवल्यानंतर पोलिसांनी (Police) या जोडप्याला तातडीने अटक केली. त्यांच्यावर बेकायदेशीर घुसखोरी, चोरी, निष्काळजीपणाने स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे आणि स्थानिक कायद्यांचे उल्लंघन करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. अमेरिकन मीडियानुसार, इवान आणि अँजेलिना हे दोघे जगभरात अशा धोकादायक स्टंटसाठीच ओळखले जातात. त्यांच्या याच छंदावर आधारित "स्काईवॉकर्स: ए लव स्टोरी" नावाची एक डॉक्युमेंट्री देखील बनवण्यात आली आहे.

जगातील विविध देशांमधील सर्वात उंच इमारतींवर कोणत्याही सुरक्षेविना चढण्याचे त्यांचे थरारक व्हिडिओ यात दाखवण्यात आले असून ही डॉक्युमेंट्री सध्या नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. मात्र, यावेळी न्यूयॉर्कच्या या ऐतिहासिक इमारतीवर स्टंट करणे त्यांना चांगलेच महागात पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'अमरनाथ यात्रा' दहशतवाद्यांच्या टार्गेटवर! हल्ल्याचा मोठा डाव, ड्रोनद्वारे शस्त्रांची तस्करी; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

Chandra Gochar 2026: भाग्य उजळणार, संपत्ती वाढणार! जुलैचा पहिला आठवडा 'या' राशींसाठी ठरणार लकी; चंद्र गोचरचा चमत्कार

Brezza Facelift 'या' दिवशी भारतात होणार लॉन्च! टर्बो इंजिन, ADAS आणि प्रीमियम फीचर्ससह SUV सेगमेंटमध्ये उडवणार धुरळा? किंमत किती?

US India Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डीलपूर्वी ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय; 4 भारतीय कंपन्यांवरील निर्बंध तात्काळ हटवले

World Sports Journalists Day 2026: 'क्रीडा पत्रकारिता' मैदानावरील थरार आणि पडद्यामागचा संघर्ष मांडणारा 'सत्याचा आवाज'!

SCROLL FOR NEXT