Volodymyr Zelenskyy Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये सत्तापालट होणार? झेलेन्स्की यांची युक्रेनियन आर्मीच्या जनरलला धमकी!

President of Ukraine Volodymyr Zelenskyy: युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनमध्ये सत्तापालट होणार का?

Manish Jadhav

Russia-Ukraine War: युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनमध्ये सत्तापालट होणार का? केवळ राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्कीचे सर्वोच्च लष्करप्रमुख त्यांच्याविरुद्ध बंड करु शकतात का? दोन्ही देशांतील तणावादरम्यान युक्रेनमधून असे प्रश्न उपस्थित करणाऱ्या बातम्या येत आहेत.

खरे तर, काही दिवसांपूर्वीच झेलेन्स्की यांनी पहिल्यांदा त्यांच्या कमावलेल्या उत्पन्नाचा तपशील सार्वजनिक केला. त्यानंतर त्यांनी युक्रेनमध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठी मोहीम सुरु केली आहे. यामुळे देशात पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही तुम्हाला अलीकडच्या काही घडामोडीबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे युक्रेनची बिघडत चाललेली स्थिती दर्शवतात.

Gen Valerii Zaluzhnyi यांना पद सोडण्याचे निर्देश दिले

मिळालेल्या माहितीनुसार, व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी त्यांचे जनरल Valerii Zaluzhnyi यांना त्यांच्या पदावरुन पायउतार होण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्यांनी तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर अध्यक्षांनी Valerii Zaluzhnyi यांनी पद सोडले नाही तर काढून टाकू अशी धमकी दिली. Valerii Zaluzhnyi हे युक्रेनमध्ये खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत. विशेष म्हणजे, ते बऱ्याच काळापासून युक्रेन आर्मीत जनरल पदावर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, याआधीही झेलेन्स्की यांनी आपल्या लष्कराच्या जनरलचा राजीनामा घेतला होता.

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी 332 कोटी रुपयांचा गंडा घातला

अलीकडेच, युक्रेनच्या (Ukraine) लष्करी अधिकाऱ्यांनी सुमारे 332 कोटी रुपये ($40 दशलक्ष) चा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे पैसे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी युद्धासाठी दारुगोळा खरेदी करण्यासाठी एका कंपनीला दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी खात्यातून पैसे काढण्यात आले, मात्र युक्रेनला आजपर्यंत शस्त्रे मिळालीच नाहीत. तपासानंतर युक्रेनच्या सुरक्षा सेवेने याप्रकरणी संबंधित लष्कराच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर, अन्य पाच अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या सर्व प्रकारामुळे देशात लष्कराच्या उच्चपदस्थ जनरलने सत्तापालट केल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket Association: प्रशांत काकोडेंचे 'आयसीए' सदस्यत्व निलंबित, जीसीए नैतिक अधिकारी-लोकपालाकडून कारवाई

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना दुर्गापूजेचं बंपर गिफ्ट! महागाई भत्त्यात होणार घसघशीत वाढ; पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

SCROLL FOR NEXT