Citizens Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये होणार सेक्स पार्टी, नोंदणीसाठी लोकांची झुंबड; जाणून घ्या कारण

दैनिक गोमन्तक

Ukrainians Plan If Putin Launch Nuke Attack: रशिया-युक्रेन युद्धाचे रुपांतर अणुयुद्धात, म्हणजे अणुबॉम्ब हल्ल्यात होऊ शकते, अशी अटकळ असताना हजारो युक्रेनियन नागरिकांनी अशा आपत्तीच्या वेळी पार्टी करण्याची योजना आखली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनमधील एका मोठ्या समूहाने पुतिन यांच्या अणुहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कीवच्या बाहेरील एका टेकडीवर सेक्स पार्टी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिग्रामवर सेक्स पार्टीसाठी आतापर्यंत 15,000 हून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अवघ्या 24 तासांपूर्वी पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशियाने युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास तिसरे महायुद्धाची धमकी दिली आहे.

दरम्यान, युक्रेनवर रशियाकडून (Russia) हल्ले होत असताना हे युद्ध कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही. दुसरीकडे, पुतीन वारंवार अणुयुध्दाची धमकी देत आहेत. अशा स्थितीत युक्रेनच्या काही लोकांनी विनाशात आनंदोत्सव साजरा करण्याचा विचित्र निर्णय घेतला आहे. युक्रेनच्या लोकांनी ग्रुप सेक्ट पार्टीसाठी नोंदणी केली आहे. जेरुसलेम पोस्टनुसार, पार्टी शहराबाहेरील एका टेकडीवर होणार आहे.

दुसरीकडे, या अनोख्या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी आतापर्यंत हजारो लोकांनी नोंदणी केली आहे. या ग्रुपचा भाग होण्यासाठी अनेक टेलीग्राम ग्रुप तयार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये लोक बिनदिक्कतपणे आपली आवड व्यक्त करत आहेत. तसेच, या पार्टीच्या आयोजकांचा दावा आहे की, लोक बंधने झुगारुन या पार्टीत सहभागी होण्यासाठी बाहेर पडत आहेत.

शिवाय, युक्रेनमधील लोक या विचित्र नियोजनाचे समर्थन करत आहेत. या कार्यक्रमाशी संबंधित एका महिलेने सांगितले की, 'अशा पार्टीची घोषणा आमचा आत्मविश्वास दर्शवते. वाईट परिस्थितीतही आपण काहीतरी चांगलं पाहण्याचा प्रयत्न करत असतो. हा युक्रेनियन लोकांचा मोठा आशावाद आहे. आमचा हा कार्यक्रम सांगण्याचा प्रयत्न आहे की, ते आम्हाला जितके घाबरवतील तितकेच निडरपणे आम्ही पुढे येऊ.'

दरम्यान, या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने युक्रेनमध्ये (Ukraine) केलेल्या अण्वस्त्र हल्ल्याची एक विचित्र दहशत आहे. अणुहल्ल्याच्या भीतीने अधिकाऱ्यांनी पोटॅशियम आयोडाइडच्या गोळ्यांचे वाटप सुरु केले आहे. कीव (Kyiv) अधिकार्‍यांनी पुष्टी केली आहे की, आम्ही सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांबद्दल लोकांना पुन्हा माहिती देत ​​आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT