Phosphorus Bomb
Phosphorus Bomb Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर टाकला 'फॉस्फरस बॉम्ब', जाणून घ्या किती धोकादायक...

Manish Jadhav

Phosphorus Bomb in Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला बराच काळ लोटला आहे. एवढा काळ उलटून गेल्यानंतरही दोन्ही देशांमधील हे युद्ध निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाही. रशियाने युक्रेनवर अनेक प्रकारे हल्ले केले आहेत.

या एपिसोडमध्ये आता युक्रेनने दावा केला आहे की, रशियाने त्यांच्या बखमुत शहरावर 'फॉस्फरस बॉम्ब' टाकला आहे. या विध्वंसाचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Russia-Ukraine War)

युद्धादरम्यान (War) नागरी भागात त्याचा वापर करण्यास बंदी आहे. फॉस्फरस बॉम्ब म्हणजे काय आणि किती धोकादायक आहे ते जाणून घेऊया. फॉस्फरस खरेदीवर बंदी नसली तरी त्यापासून बनवलेल्या बॉम्बच्या वापराबाबत काही नियम करण्यात आले आहेत.

फॉस्फर बॉम्बमुळे असे नुकसान होते

फॉस्फरस हे मऊ रेझिनस रसायन आहे. जेव्हा ते ऑक्सिजनच्या संपर्कात येते तेव्हा ते वेगाने जळते आणि आग सर्वत्र पसरु लागते. फॉस्फरसचे तापमान 800 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त असते. त्याचे कण दूरवर पसरतात, ज्याच्या संपर्कात येणाऱ्याचा जीवही जाऊ शकतो.

ऑक्सिजन संपेपर्यंत हा बॉम्ब जळत राहतो

इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसच्या म्हणण्यानुसार, त्या भागातील ऑक्सिजन संपेपर्यंत हा बॉम्ब जळत राहतो. त्याचे कण त्या भागात असलेल्या मानवाच्या शरीराला चिकटून राहतात. यामध्ये आढळणारे फॉस्फोरिक पेंटॉक्साइड रसायन शरीराला हानी पोहोचवते.

फॉस्फरस बॉम्बच्या वापराबाबत हा नियम आहे

1977 मध्ये स्वित्झर्लंडमधील (Switzerland) जिनिव्हा येथे झालेल्या अधिवेशनात व्हाईट फॉस्फोरसच्या वापराबाबत काही नियम करण्यात आले होते. या अंतर्गत, नागरी भागात त्याचा वापर करण्यास मनाई आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

Alcohol Seized : महाराष्‍ट्रातून गोव्‍यात आणलेली ८.४१ लाखांची दारू पकडली

Panaji News : बाबूशला पंच रबरस्टँप म्हणून हवेत; सिसील-फ्रान्सिस यांचा आरोप

Loksabha Election 2024 : मडकईतून ९० टक्के मतदानासाठी प्रयत्न भर! सुदिन ढवळीकर

SCROLL FOR NEXT