Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

Vladimir Putin: पुतीन यांची मोठी घोषणा, युक्रेनची चार राज्ये रशियात केली विलीन

Russia Ukraine News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ऐतिहासिक पाऊल उचलत शुक्रवारी युक्रेनमधील चार राज्ये आपल्या देशात विलीन केली.

दैनिक गोमन्तक

Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ऐतिहासिक पाऊल उचलत शुक्रवारी युक्रेनमधील चार राज्ये आपल्या देशात विलीन केली. गेल्या वर्षभरापासून युक्रेनसोबत सुरु असलेल्या युद्धात रशियासाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे. पुतीन यांनी या राज्यांतील प्रमुखांचीही नियुक्ती केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी एका ऐतिहासिक समारंभात व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनची (Ukraine) चार राज्ये आपल्या देशात विलीन केली, असे रशियन सरकारी वृत्तसंस्था टासने म्हटले. डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझ्झ्या आणि खोरासन अशी या राज्यांची नावे आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी क्रेमलिनमध्ये सही करुन हे प्रदेश ताब्यात घेतले. ऐतिहासिक भाषणाने पुतिन यांनी या राज्यांच्या प्रमुखांचीही नियुक्ती केली आहे.

सार्वमतामध्ये मॉस्कोचा पाठिंबा मिळाला

युक्रेनच्या या राज्यांमध्ये सार्वमत घेण्यात आल्याचा दावा क्रेमलिनने केला आहे. ज्यामध्ये 99 टक्के लोकांनी मॉस्कोच्या (Moscow) समर्थनार्थ मतदान केले. लवकरच ही राज्ये रशियात विलीन होणार असल्याची घोषणा क्रेमलिनने त्यावेळी केली होती.

पश्चिमेने इशारा दिला होता

युक्रेनसह पाश्चिमात्य देशांनी युक्रेनची राज्ये आपल्या देशात विलीन केल्याबद्दल रशियाचा (Russia) निषेध केला होता. असे झाल्यास रशियाला नव्या निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही पाश्चिमात्य देशांनी रशियाला दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT