Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियाचा सर्वात मोठा हल्ला! युक्रेनवर डागली 110 क्षेपणास्त्रे; पुन्हा उडाली खळबळ

Russia Attack On Ukraine: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरुच आहे. रशियाचे सैन्य युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहेत.

Manish Jadhav

Russia Attack On Ukraine: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरुच आहे. रशियाचे सैन्य युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहेत. रशिया युक्रेनच्या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ले करत आहे. यातच आता, रशियाने युक्रेनवर 110 क्षेपणास्त्रे डागली आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ही माहिती दिली आहे. झेलेन्स्की म्हणाले की, काल रात्री रशियाने युक्रेनवर सुमारे 110 क्षेपणास्त्रे डागली. 22 महिन्यांतील रशियाने केलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियन हल्ला 18 तास चालला आणि बहुतेक रशियन क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले. यात 18 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

सर्व प्रकारच्या शस्त्रांचा वापर

झेलेन्स्की म्हणाले की, क्रेमलिन सैन्याने या हल्ल्यांमध्ये बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला. यासोबतच विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर करण्यात आला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज रशियाकडे असलेल्या जवळपास सर्व प्रकारची शस्त्रे वापरली जात आहेत.

आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला

युक्रेनचे लष्करी प्रमुख व्हॅलेरी झालुझनी यांनी सांगितले की, युक्रेनच्या हवाई दलाने रात्रभर 87 क्षेपणास्त्रे आणि 27 प्रकारचे ड्रोन रोखले, अशी बातमी एपीने दिली. हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेशचुक यांनी त्यांच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर लिहिले की, फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला होता. या युद्धात अमेरिकेसह पाश्चात्य देश युक्रेनला पाठिंबा देत आहेत. अमेरिका युक्रेनला आर्थिक मदत आणि लष्करी सामग्री पुरवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT