Russia Ukriane War Twitter
ग्लोबल

67व्या दिवशीही युद्ध सुरूच, रशियाच्या रॉकेट हल्ल्यात युक्रेनच्या ओडेसा शहराची धावपट्टी उद्ध्वस्त

मॉस्कोने युक्रेनमधून दहा लाख लोकांना बाहेर काढले - रशियाचे परराष्ट्र मंत्री

दैनिक गोमन्तक

रशियन रॉकेट हल्ल्याने युक्रेनमधील तिसरे सर्वात मोठे शहर ओडेसा आणि ब्लॅक सी पोर्टमधील विमानतळाच्या धावपट्टीचे नुकसान झाले. युक्रेनच्या लष्कराने शनिवारी ही माहिती दिली. युक्रेनच्या ऑपरेशनल कमांड साउथने टेलिग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की रॉकेट हल्ल्यानंतर ओडेसा धावपट्टी वापरण्यायोग्य राहिली नाही. (Russia Ukriane War)

युक्रेनियन वृत्त समिती UNIAN ने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, स्थानिक प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितले आहे. ओडेसामध्ये अनेक स्फोट झाले आहेत. ओडेसाच्या प्रादेशिक गव्हर्नरने सांगितले की, रॉकेट रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियामधून डागण्यात आले. मात्र सुदैवाने या हल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मॉस्कोने युक्रेनमधून दहा लाख लोकांना बाहेर काढले - रशियाचे परराष्ट्र मंत्री

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी सांगितले की, युद्ध सुरू झाल्यापासून मॉस्कोने युक्रेनमधून दहा लाखांहून अधिक लोकांना बाहेर काढले आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआला दिलेल्या मुलाखतीत लावरोव्ह यांनी ही माहिती दिली. लावरोव्हचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा युक्रेनने मॉस्कोवर युक्रेनियन लोकांना जबरदस्तीने देशाबाहेर पाठवल्याचा आरोप केला होता. या आकडेवारीमध्ये 300 हून अधिक चिनी नागरिकांचा समावेश आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात जवळजवळ दररोज चर्चा सुरू आहे. मात्र त्यांनी सावध केले की या संदर्भात प्रगती करणे सोपे नाही. असे लावरोव्ह यांनी सागंतिले.

दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की (Ukraine President Volodymyr Zelenskyy) यांनी रात्रीच्या भाषणात रशियन सैनिकांना संदेश पाठवला, ज्याला आपण एक चेतावणी देखील म्हणू शकतो. रिपोर्ट्सनुसार,'प्रत्येक रशियन सैनिक अजूनही आपला जीव वाचवू शकतो. आमच्या मातीवर मरण्यापेक्षा रशियामध्ये जिवंत राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. युक्रेन युद्ध 67 व्या दिवसात प्रवेश करत असताना झेलेन्स्की यांनी हे विधान केले आहे . या आठवड्यात अनेक महत्त्वाचे अमेरिकन अधिकारी युद्धग्रस्त देशात आले. अमेरिकेचे संरक्षण सचिव अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्यापासून ते संयुक्त राष्ट्रांपर्यंत (United Nations). सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी युक्रेनला भेट दिली आहे. त्यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. युद्ध संपवण्याच्या उद्देशाने या सर्वांनी युक्रेनला भेट दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT