Russia Ukraine Crisis: ukrainian women claims russian soldiers offer request for date on tinder  Dainik Gomantak
ग्लोबल

टिंडरवरून युक्रेनियन महिलांबरोबर फ्लरटिंग करण्याचा रशियन सैनिकांचा प्रयत्न

टिंडरवर सर्व रशियन सैनिकांचे संदेश येत आहेत.

दैनिक गोमन्तक

अखेर आज रशियाने युक्रेनवर (russia-ukraine) आक्रमण सुरू केले आहे आणि त्याचे सैन्य आधीच युक्रेनच्या फुटीरतावादी भागात पोहोचले आहे. दरम्यान, एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रशियन सैनिक डेटिंग अॅप टिंडरवर युक्रेनियन महिलांना मेसेज आणि कॉल करत आहेत. युक्रेनमधील एका महिलेने हा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर महिलेने त्याचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. (Russia Ukraine Crisis: ukrainian women claims russian soldiers offer request for date on tinder)

खरं तर, युक्रेनवर हल्ला केल्याची घोषणा केल्यानंतर लगेचच रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. दरम्यान, या महिलेच्या या दाव्याने जगभरातील वृत्तसेवांमध्ये खळबळ उडाली आहे. 'द सन'नेही या महिलेशी संवाद साधला आणि महिलेने याबाबत माहिती दिली आणि तिचे नाव दशा सिनेलनिकोवा असल्याचे सांगितले. महिलेने सांगितले की, एका रशियन सैनिकाने तिला फ्लर्ट करण्याच्या उद्देशाने टिंडरवर मेसेज केला होता, त्यानंतर दोघांनी चॅटही केले होते. (Russia Ukraine Crisis)

रिपोर्टनुसार, महिलेने असेही सांगितले की टिंडरवर सर्व रशियन सैनिकांचे संदेश येत आहेत. प्रोफाइलमध्ये रशियन सैन्याचा गणवेश परिधान केलेले लोक दाखवले आहेत. महिलेने त्यांचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. या महिलेशिवाय अनेक महिलांना रशियन सैनिकांचे मेसेज येत असून ते फ्लर्ट करत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक सैनिकांनी महिलांना त्यांच्या पोझिशनची माहिती फोटोसह पाठवली आहे.ही बातमी आणि स्क्रीनशॉट व्हायरल होताच रशियन सैनिकांना आनंद झाल्याचेही सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT