Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

जगातील सर्वात मोठ्या बिअर कंपनीने रशियातून घेतला काढता पाय

युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध पुकारणे रशियाला (Russia) चांगलंच महागात पडलं आहे. एकामागून एक बहुराष्ट्रीय कंपन्या देश सोडून जात आहेत.

दैनिक गोमन्तक

युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध पुकारणे रशियाला (Russia) चांगलंच महागात पडलं आहे. एकामागून एक बहुराष्ट्रीय कंपन्या देश सोडून जात आहेत. ताजे प्रकरण जगातील सर्वात मोठी बिअर निर्माती कंपनीशी संबंधित आहे. बेल्जियमची (Belgium) बहुराष्ट्रीय मद्य कंपनी AB InBev ने Anadolu Efes ला रशियामध्ये BUD ब्रँडचे उत्पादन आणि विक्री करण्याचा परवाना निलंबित करण्यास सांगितले आहे. कंपनीने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. ही कंपनी Budweiser नावाची बिअर बनवते आणि रशियात विकते. AB InBev चा जागतिक बाजारपेठेत 28 टक्के हिस्सा आहे.

दरम्यान, कंपनीने सांगितले की, 'आम्ही रशिया आणि युक्रेनमध्ये संयुक्तरित्या व्यवसाय करत आहोत. त्यासाठी तुर्कीच्या वाईन बनवणाऱ्या अनाडोलू एफेसमध्ये विलीन करण्यात आले.' तथापि, AB InBev कडे या व्यवसायात कोणताही स्टेक नाही. निवेदनानुसार, एबी इनबेव्हने रशियामध्ये BUD ब्रँडचे उत्पादन आणि विक्री करण्याचा परवाना निलंबित करण्याच्या विनंतीसह Anadolu Efes शी संपर्क साधला आहे. कंपनीने रशियामधील संयुक्त व्यवसायामुळे होणारे सर्व आर्थिक लाभ वगळण्याचा निर्णयही घेतला आहे. कंपनीकडून असे करणे हे मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

कार्ल्सबर्ग आणि हेनेकेन यांनीही रशिया सोडला

तत्पूर्वी, मद्यविक्रेते कार्ल्सबर्ग आणि हेनेकेन यांनी सोमवारी सांगितले की, 'आम्ही रशियामधील कामकाज बंद करत आहोत.' कंपनीने सांगितले की, ''कार्ल्सबर्गसाठी रशिया सोडणे हा तोट्याचा सौदा ठरेल, कारण रशियामध्ये ब्रॅंडची विक्री अधिक आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची अधिक माहिती दिलेली नाही. बाल्टिका या रशियातील सर्वात मोठ्या ब्रुअरच्या मालकीद्वारे कंपनीचा स्थानिक बाजारपेठेतील 27 टक्के हिस्सा आहे.'' कार्ल्सबर्ग म्हणाले, "आम्ही रशियामधील आमचा व्यवसाय संपवण्याचा आणि तत्काळ थांबविण्याचा निर्णय घेतला आहे."

गोल्डन पासपोर्ट योजना रद्द करण्याची मागणी

त्याच वेळी, युरोपीय आयोगाने सोमवारी युरोपियन युनियनच्या (European Union) सदस्य देशांना 'गोल्डन पासपोर्ट योजना' रद्द करण्याची शिफारस केली. क्रेमलिन ( Russian presidential office) किंवा ज्यांनी युक्रेनवरील रशियन हल्ल्याचे समर्थन केले आहे, त्यांच्याशी संबंधित नागरिकांना यापूर्वी दिलेले नागरिकत्व अधिकार रद्द करण्याचा त्यांनी विचार करावा अशी विनंती देखील केली. 'गोल्डन पासपोर्ट स्कीम' अंतर्गत श्रीमंत लोकांना युरोपीय देशांचे नागरिकत्व विकत घेण्याची मुभा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT