Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukarine War: नागरिकत्व देण्याच्या नावाखाली रशिया परदेशी नागरिकांना ढकलतोय युद्धात; 40 हजार लोकांना फॉर्म भरण्याची सक्ती

Russia: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच आहे. आता आपण मागे हटणार नसल्याचे पुतिन यांनी आपले इरादे स्पष्ट करत सांगितले आहे.

Manish Jadhav

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच आहे. आता आपण मागे हटणार नसल्याचे पुतिन यांनी आपले इरादे स्पष्ट करत सांगितले आहे. पण दिर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे रशियाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

रशियाला सध्या सैन्यांची कमतरता भासत आहे. याचाच विचार करुन पुतिन यांनी आता रशियन नागरिकत्व मिळवणे सोपे केले आहे.

दरम्यान, पुतिन यांनी युक्रेनमध्ये लढण्यासाठी सुमारे 10,000 नॅचुरलाइज्ड सिटिजन्सना पाठवल्याची माहिती समोर आली आहे. ज्या लोकांना परदेशी नागरिकत्व दिले जाते त्यांना नॅचुरलाइज्ड सिटिजन्स म्हटले जाते. खुद्द रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, काही नागरिकांनी (Citizens) युद्धात भाग घेण्याऐवजी देश सोडणे पसंत केले आहे, असेही रशियन अधिकाऱ्याने सांगितले. लष्करी हल्ल्यासाठी सैनिकांची संख्या वाढवण्यासाठी मॉस्को मध्य आशियाई स्थलांतरितांना सैन्यात भरती होण्यास भाग पाडत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे सर्व स्थलांतरित युक्रेनविरुद्धच्या युद्धात भाग घेऊ शकतील.

रशियन अधिकारी काय म्हणाले?

रशियाच्या तपास समितीचे प्रमुख अलेक्झांडर बॅस्ट्रीकिन यांनी सांगितले की, रशिया रशियन नागरिकत्व मिळवलेल्या स्थलांतरितांवर रशिया दबाव टाकत आहे. परंतु या सर्व नागरिकांनी लष्करी अधिकाऱ्यांकडे नोंदणी केलेली नाही.

बॅस्ट्रीकिन पुढे म्हणाले की, आम्ही रशियन नागरिकत्व घेतलेल्या 30,000 हून अधिक लोकांना अटक केली आहे. पण या लोकांना लष्करी सेवेसाठी नोंदणी करायची नव्हती. मात्र, त्यांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. बॅस्ट्रीकिन पुढे असेही म्हणाले की, "विशेष लष्करी कारवाईचा भाग म्हणून सुमारे 10,000 लोकांना आधीच युक्रेनमध्ये पाठवण्यात आले आहे.''

मध्य आशियातील बहुतेक लोक

लाखो स्थलांतरित इतर देशांतून काम करण्यासाठी रशियात येतात, त्यापैकी बहुतेक मध्य आशियातील आहेत. रशियाने (Russia) अलिकडच्या वर्षांत त्यांच्यासाठी रशियन नागरिकत्व मिळवणे सोपे केले आहे. मात्र रशियातील या स्थलांतरितांपुढे मोठे आव्हान आहे. रशियामधील स्थलांतरितांना लष्करी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करण्यास भाग पाडले जाते. यामुळे लोक हळूहळू रशियाचे नागरिकत्व सोडत आहेत, असेही बॅस्ट्रिकिन यांनी पुढे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: अंत्यविधीच्या ठिकाणी 'ऑर्केस्ट्रा'! एका बाजूला चिता जळतेय, दुसऱ्या बाजूला गाण्यांवर डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Ind A vs SA A: सलामीवीर ढेपाळले, मधल्या फळीनेही हात टेकले, आफ्रिकेने टीम इंडियाला 73 धावांनी चारली पराभवाची धूळ; क्लीन स्वीपचे स्वप्न भंगले! VIDEO

Konkan Railway: कोकण रेल्वेतील मोठी कारवाई! नागरकोइल-गांधीधाम एक्सप्रेसमध्ये दारुच्या बाटल्यांनी भरलेल्या बेवारस बॅगा जप्त; 'टीसी'च्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

Goa Tourism: आखाती देशांतील पर्यटक आकर्षित करण्यासाठी गोवा सज्ज! थेट बहरीनमध्ये आयोजित केलाय रोड शो

World Cup 2026: क्रिकेट वर्ल्ड कप शेड्यूल जाहीर, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; चाहत्यांची वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT