Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

रशियात लिंग बदलास बंदी, व्लादिमीर पुतिन यांची कायद्यावर स्वाक्षरी; LGBTQ+ समुदायाला धक्का

संसदेच्या दोन्ही सभागृहांत एकमताने हा कायदा मंजूर झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Russia puts ban on gender change

रशियात वैद्यकीय शस्त्रक्रिया करून लिंग बदल करण्यास बंदी घातली आहे. याबाबतच्या कायद्यावर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वाक्षरी केली आहे. या कायद्यामुळे रशियातील LGBTQ+ समुदायाला मोठा धक्का बसला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत एकमताने हा कायदा मंजूर झाला आहे.

याशिवाय या कायद्याद्वारे लिंग बदल केलेल्या व्यक्तींना मुले दत्तक घेण्यावरही बंदी घातली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जोपड्यातील एक जोडीदार ट्रान्सजेंडर असल्यास तो विवाह देखील रद्द करण्याची तरदूत या कायद्यात आहे. सरकारी संकेतस्थळावर प्रकाशित झाल्यानंतर लगेच हा कायदा लागू होईल. असे द मॉस्को टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, या कायद्यामुळे ट्रान्सजेंडर लोकांमध्ये आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रमाण वाढेल. असा इशारा एलजीबीटी समुदायातील लोकांनी दिला आहे.

देशाच्या पारंपारिक मूल्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून बंदी घातली गेल्याचे म्हटले जात आहे. पाश्चिमात्य-कुटुंब विरोधी विचारसरणीपासून रशियाचे रक्षण करण्यासाठी हा कायदा महत्वाचा असल्याचे खासदारांनी म्हटले आहे.

क्रेमलिनद्वारे 2013 मध्ये अल्पवयीन मुलांमधील अपारंपरिक लैंगिक संबंधच्या समर्थनाला बंदी घालणारा कायदा केला. पुढे 2020 मध्ये, पुतिन यांनी घटनात्मक सुधारणांद्वारे समलैंगिक विवाह बेकायदेशीर ठरवण्यात आला. आणि मागील वर्षी प्रौढांमधील अपारंपरिक लैंगिक संबंधाच्या प्रचारावर देखील बंदी घालणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: "माझे घर" योजना सप्टेंबरपासून लागू - मुख्यमंत्री

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT