Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: रशियाने पुन्हा केले हल्ले तीव्र, पुतीन यांच्या 'विंटर प्लन' ने युक्रेनला धास्ती

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे.

Manish Jadhav

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे. जवळपास दोन महिन्यांच्या शांततेनंतर युक्रेनची राजधानी कीववर पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. मात्र, या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाला नाही.

शनिवारी युक्रेनमध्ये खेरासन शहराच्या रशियाच्या ताब्यापासून मुक्तीचा आनंद साजरा केला गेला. खेरासनच्या लढाईला एक वर्ष पूर्ण झाले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी खेरासनचे 'आशा पल्लवीत करणारे शहर' असे वर्णन केले.

झेलेन्स्की म्हणाले की, काल संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत रशियाने जवळपास 40 ड्रोन आणि रॉकेट हल्ले केले आहेत. ओडेसा आणि खार्किव येथेही हे हल्ले करण्यात आले. युक्रेनचे म्हणणे आहे की, या वर्षी हिवाळा सुरु होताच रशिया पुन्हा एकदा हल्ले तीव्र करु शकतो आणि ऊर्जा स्त्रोतांवर हल्ला करु शकतो.

या केंद्रांवर हल्ला करुन रशियाला हिवाळ्यात युक्रेनमधील वीजपुरवठा बंद करायचा आहे. कीवमधील लष्कराच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, 52 दिवसांच्या शांततेनंतर राजधानीवर क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे.

युक्रेनच्या (Ukraine) लष्कराने म्हटले आहे की, दोन क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्रे एकतर इसकंदर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे किंवा S-400 विमानविरोधी क्षेपणास्त्रे होती. यापूर्वी 21 सप्टेंबर रोजी युक्रेनच्या लष्कराने एका क्षेपणास्त्राला लक्ष्य केले होते. विशेष म्हणजे, यामध्ये एका लहान मुलासह सात जण जखमी झाले होते.

रिजनल लष्करी प्रशासनाचे म्हणणे आहे की, कीवच्या आसपासच्या भागात दोन क्षेपणास्त्रे पडली, ज्यामुळे काही घरांचे नुकसान झाले. हवाई दलाने रशियाचे 31 पैकी 19 ड्रोन नष्ट केले. सुमी येथे शनिवारी रशियन हल्ल्यात दोन जण ठार झाले.

याशिवाय, ओडेसामध्येही दोन क्षेपणास्त्रे पडली, ज्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष जखमी झाले. युक्रेनियन लोकांना भीती वाटते की, रशिया ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करु शकतो. रशियाकडून (Russia) तेल आणि वायूच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची भीती आहे, असा इशारा युक्रेनने जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 25 जणांचा बळी गेला, 40 दिवस उलटले; मुख्य सूत्रधार अजूनही गुलदस्त्यात, जबाबदारी एकामेकांवर ढकलण्‍याची संगीत खुर्ची

India America Trade War: "मोदींशी लवकरात लवकर बोला'', ट्रम्प यांना खासदारांचं पत्र, भारत-अमेरिका 'ट्रेड वॉर'मध्ये आता डाळींचा पेच, कोण घेणार पुढाकार?

Goa Politics: खरी कुजबुज; काल किती खून झाले?

Goa Latest Updates: कुडचडे येथे भीषण अपघात: कार आणि डंपरची समोरासमोर धडक; एक जखमी

Goa Airline Incentive Scheme: गोव्यात विमान कंपन्यांना मिळणार 'बुस्टर डोस'! नवीन मार्गांसाठी तगडं अनुदान; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 'एअरलाईन इन्सेन्टिव्ह' योजना

SCROLL FOR NEXT