Russia-Ukraine war  Dainik Gomantak
ग्लोबल

रशियाने एका दिवसात युक्रेनवर केले 56 हल्ले

खार्किव प्रादेशिक लष्करी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्याने युद्धात भयानक विध्वंस घडवून आणला आहे. अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. यूएनचे प्रवक्ते एरी कानेको यांनी सांगितले की, मार्चच्या अखेरीस युक्रेनमधील होरेन्का शहर सुमारे 77 टक्के, इरपिन 71 टक्के आणि हॉस्टोमेल 58 टक्के नष्ट झाले आहे, असे असूनही रशियन सैन्य हल्ले करत आहे. 22 एप्रिल (शुक्रवार) रशियाने खार्किवमध्ये एकापाठोपाठ एक 56 हल्ले केले. (Russia launches 56 attacks on Ukraine in one day)

खार्किव प्रादेशिक लष्करी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या (Russia) हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, युक्रेनकडून असा दावा करण्यात आला आहे की 22 एप्रिल रोजी युक्रेनच्या सैन्याने डॉनबासमध्ये सुमारे 50 रशियन उपकरणे नष्ट केली.

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाल्याचे संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते एरी कानेको यांनी सांगितले. हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनने मागितलेली शस्त्रे मित्र राष्ट्रांनी "शेवटी" पुरवली. झेलेन्स्की यांनी मित्र राष्ट्रांचे आभार मानले की त्यांनी युक्रेनचे ऐकले आणि शस्त्रे (Weapons) दिली. या शस्त्रांमुळे हजारो निष्पाप लोकांचे प्राण वाचतील, असे ते म्हणाले. तसेच रशियाला लवकरच युक्रेन सोडण्यास भाग पाडले जाईल असेही सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT