Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशिया अन् अमेरिका आता आमनेसामने

रशियाने (Russia) अमेरिकेमधून आपले अधिकाऱ्यांना मायदेशी आणण्यासाठी एक विमान पाठवले आहे.

दैनिक गोमन्तक

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. यातच आता रशियाने अमेरिकेमधून आपले अधिकाऱ्यांना मायदेशी आणण्यासाठी एक विमान पाठवले आहे. (Russia has sent plane to United States to repatriate its officials)

दरम्यान, रशियाने युक्रेनचा (Ukraine) झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला आहे. युरोपातील या सर्वात मोठ्या अणु प्रकल्पाच्या बाहेरील भागाला लागलेल्या आगीमुळे जगात एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता आग आटोक्यात आणण्यात आली आहे. चेर्नोबिल अणुप्रकल्पातून ते बऱ्यापैकी सुरक्षित केले गेले असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीत एखादी छोटीशी ठिणगी मध्य युरोपसाठी कधीही मोठी संकट बनू शकते.

चिंता कमी झालेली नाही: अणु सुरक्षा तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने झापोरिझिया अणुउर्जा प्रकल्प सध्या धोक्याच्या बाहेर असल्याचे म्हटले आहे. झापोरिझियाची रचना चेर्नोबिलपेक्षा वेगळी आहे. त्याची सुरक्षा व्यवस्था बरीच प्रगत असून आगीपासून सुरक्षित ठेवू शकते. तथापि, ओबामा प्रशासनाच्या काळात नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलवर वरिष्ठ संचालक म्हणून काम केलेल्या जॅन वुल्फस्टॉल यांनी म्हटले आहे की, 'अणु संयंत्राजवळील युद्ध कारवायांमुळे कधीही मोठा अनर्थ घडू शकतो.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT