Mariupol News | Vladimir Putin on Mariupol | Mariupol Liberated Dainik Gomantak
ग्लोबल

Ukraine War: "मारियुपोल झाले मुक्त", पुतिन यांनी केली घोषणा

रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात मागील दीड- दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे.

Manish Jadhav

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दीड- दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. यातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी मोठी घोषणा केली. रशियाने मारियुपोलला "मुक्त" केल्याचे पुतीन यांनी म्हटले. तत्पूर्वी, रशियाचे (Russia) संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी पुतीन यांना सांगितले की, ''रशियाने युक्रेनच्या (Ukraine) मारियुपोल शहरातील अझोव्स्टल स्टील प्लांटचा ताबा घेतला आहे. अझोव्ह समुद्रात वसलेल्या मारियुपोलचे संपूर्ण नियंत्रण रशियासाठी एक मोठा सामरिक विजय असेल.'' (Russia has liberated Mariupol said Russian President Vladimir Putin)

दरम्यान, पूर्व युक्रेनमधील रशियन समर्थक फुटीरतावाद्यांच्या ताब्यातील प्रदेश क्रिमियाला जोडण्याचा मार्ग मोकळा होईल, जो पूर्वी युक्रेनच्या कब्जात होता. यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या लष्कराला युक्रेनचा शेवटचा गड मारियुपोलवर हल्ला न करण्याचे आदेश दिले.

तत्पूर्वी, रशियन सैन्याने मारियुपोलमध्ये तैनात असणाऱ्या युक्रेनियन सैन्यांना शस्त्रे खाली टाकण्याचा अल्टिमेटम दिला होता. शस्त्रे खाली टाकल्यास जिवदान दिले जाईल, असेही रशियन सैन्यांकडून सांगण्यात आले होते. आज तोपर्यंत मारियुपोल शहरावर कब्जा केल्याची घोषणा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केली.

तसेच, शोइगु यांनी पुतीन यांना एका व्हर्च्युअल बैठकीत सांगितले की, "मारियुपोल मुक्त झाले आहे." ते पुढे म्हणाले की, 'उर्वरित राष्ट्रवादी गटांनी अजोवास्टल प्लांटच्या औद्योगिक क्षेत्रात आश्रय घेतला आहे.'

शोइगु म्हणाले की, 'सुमारे 2,000 युक्रेनियन सैनिक प्लांटमध्ये आहेत, जिथे ते भूमिगत सेवा वापरत आहेत.'

पुतीन पुढे म्हणाले की, 'मारियुपोलचे "स्वातंत्र्य" हे रशियन सैन्यासाठी "यश" होते. परंतु त्यांनी शोइगुला औद्योगिक क्षेत्रावरील पूर्वनियोजित ताबा सोडण्याचे आदेश दिले आहेत.' यास पुतीन यांनी "अव्यवहार्य" म्हटले.'

जवळपास एक महिन्यापासून रशियन सैन्याने मारियुपोलला वेढा घातला होता. दरम्यान या शहरात हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. शहरात अनेक जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे, ‘मराठा’ उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर गोव्यात बदल घडला

SCROLL FOR NEXT