Haryana Youth Recounts Horror In Russia Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: ''मला चटके देण्यात आले, 16 दिवस खायला दिले नाही''; रशियातून परतलेल्या मुकेश सांगितली आपबिती

Haryana Youth Recounts Horror In Russia: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी भारतीय तरुणांना नोकरी देण्याच्या बहाण्याने रशियाला नेल्याचे प्रकरण समोर आले होते.

Manish Jadhav

Haryana Youth Recounts Horror In Russia: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी भारतीय तरुणांना नोकरी देण्याच्या बहाण्याने रशियाला नेल्याचे प्रकरण समोर आले होते. विशेष म्हणजे, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली फसवणूक झाल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. रशिया त्यांना जबरदस्तीने युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासाठी पाठवत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. हरियाणाचा रहिवासी असलेला मुकेश देखील बेकायदेशीररित्या रशियाला पोहोचला होता. एजंटनी त्याला नोकरी आणि रशियन मुलीसोबत लग्नाचे आमिष दिले होते. पण प्रत्यक्षात तिथे त्याला युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी तैनात केले. मात्र, तो कसा तरी भारतात परतला. आता त्याने रशियात आपल्यासोबत काय घडले याची आपबीती सांगितली.

रशियात 300 भारतीय अडकले आहेत

दरम्यान, मुकेश त्याचा चुलत भाऊ सनीसोबत रशियाहून भारतात परतला आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, रशियामध्ये त्यांच्यासोबत जवळपास 300 भारतीय होते. लाखो रुपयांच्या मोबदल्यात एजंटनी नोकरी देण्याच्या बहाण्याने सर्वांना रशियाला पाठवले, असा त्यांचा दावा आहे. परदेशात जाऊन पैसे कमावण्यासाठी नोकरीच्या शोधात असतानाच तो एजंटच्या संपर्कात आल्याचे त्याने सांगितले.

10 लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यात आली

मुकेशने सांगितले की, एजंटंनी त्याला बेकायदेशीररित्या जर्मनीला पाठवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु तत्पूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये त्याला बँकॉकला पाठवण्यात आले होते. बँकॉकमध्ये, एजंटच्या साथीदारांनी त्याला ओलीस ठेवले आणि जेव्हा त्याने विरोध केला तेव्हा त्यांनी त्याला मारहाण केली आणि सिगारेटचे चटके दिले. याशिवाय, त्याला आणि त्याच्या भावाला जंगलात ठेवले होते. एजंटच्या साथीदारांनी कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलवर बोलून 10 लाख रुपयांची खंडणी मागणी केली. कुटुंबीयांनीही कशीतरी जमीन विकून ही रक्कम दिल्याचे त्याने सांगितले.

10 वर्षे तुरुंगात टाकण्याची धमकी

मुकेशने पुढे सांगितले की, तो 16 दिवस जंगलात राहिला, तिथे त्याला काहीही खायला दिले गेले नाही. यानंतर, त्याला रशियन सैन्याच्या वतीने युक्रेनविरुद्धच्या युद्धात सामील होण्यास भाग पाडले गेले. मात्र, तसे करण्यास त्याने नकार दिल्यास त्याला 10 वर्षे तुरुंगवासाची धमकी देण्यात आली होती. युक्रेनविरुद्धच्या युद्धात दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. रशियात अडकलेल्या भारतीयांनी मॉस्कोमधील भारतीय अधिकाऱ्यांशी कसा तरी संपर्क साधला होता. त्यानंतर रशियन सैन्यात काम करणारे काही लोक भारतात परतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT