Russia Fire Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Fire: रशियात मोठी दुर्घटना, गॅस स्टेशनच्या स्फोटात 12 ठार, 60 हून अधिक जखमी

Russia Fire: रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच रशियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

Russia Fire: रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच रशियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गॅस स्टेशनला आग लागल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. ही घटना रशियाच्या (Russia) दागेस्तानी शहरातील आहे.

रिपोर्टनुसार, हायवेच्या बाजूला असलेल्या एका ऑटो रिपेअर शॉपमध्ये आग लागली आणि काही वेळात ती जवळच्या गॅस स्टेशनमध्ये पसरली. त्यामुळे गॅस स्टेशनला भीषण आग (Fire) लागली. या आगीमुळे एक मजली घरही जळून खाक झाले. या आगीत 12 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, परिस्थिती युद्धासारखी होती. दागेस्तानीचे गव्हर्नर सर्गेई मेलिकोव्ह यांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमींमध्ये 13 मुलांचा समावेश आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना साडेतीन तास लागले. या आगीने 600 चौरस मीटर क्षेत्राला वेढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT