Moscow Concert Hall Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Video: ''मला पैशाच्या बदल्यात लोकांना मारण्याची ऑफर दिली"; रशियाने पकडलेल्या हल्लेखोराचा मोठा खुलासा

Moscow Concert Hall Attack: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, रशिया दोन दशकांतील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याने हादरला आहे.

Manish Jadhav

Moscow Concert Hall Attack:

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, रशिया दोन दशकांतील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याने हादरला आहे. रशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी 11 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. पकडण्यात आलेल्या एका संशयित दहशतवाद्याने या हल्ल्याबाबत सर्वात मोठा खुलासा केला आहे. पकडलेल्या दहशतवाद्याने चौकशीदरम्यान रशियन एजन्सींना सांगितले की, "मी इथे ताजिकिस्तानमधील इतर स्थलांतरितांसोबत एका वसतिगृहात राहत होतो. संशयित दहशतवाद्याने पुढे सांगितले की, मी नोकरीच्या शोधात होतो, परंतु मला खूप दिवसांपासून नोकरी मिळाली नाही. याचदरम्यान अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीने मला पैशासाठी लोकांना मारण्याची ऑफर दिली.

दुसरीकडे, रशियाच्या तपास यंत्रणांनी या प्रकरणात तत्परता दाखवत 11 जणांना अटक केली आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसच्या प्रमुखाने शनिवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना याबाबत माहिती दिली. रशियाची सरकारी न्यूज एजन्सी टासच्या हवाल्याने ही अपडेट समोर आली आहे.

दरम्यान, मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी रशियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या क्रेमलिनने सांगितले की, हल्लेखोरांनी क्रोकस सिटी हॉलवर हल्ला केल्यानंतर काही मिनिटांत पुतिन यांना याची माहिती देण्यात आली. हॉल हे मॉस्कोच्या पश्चिमेकडील असलेले एक मोठे संगीत ठिकाण आहे, ज्यामध्ये 6,200 लोक बसू शकतात. प्रसिद्ध रशियन रॉक बँड पिकनिकच्या मैफिलीसाठी क्रोकस सिटी हॉलमध्ये लोकांची गर्दी जमली होती तेव्हा हा हल्ला झाला. अहवालात म्हटले आहे की, हल्लेखोरांनी स्फोटके फेकल्यानंतर आग लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

सामूहिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा

शुक्रवारी क्रोकस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाच्या संस्कृती मंत्रालयाने शनिवारी मोठा निर्णय घेतला. मंत्रालयाने येत्या काही दिवसांत फेडरल सांस्कृतिक संस्थांमधील सर्व सामूहिक आणि मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली. मंत्रालयाकडून शनिवारी ही माहिती देण्यात आली. फेडरल सांस्कृतिक संस्थांमधील सामूहिक आणि मनोरंजन कार्यक्रम येत्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत. मंत्रालयाने क्रोकस सिटी हॉलमध्ये मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती शोक व्यक्त केला. ऑक्टोबर 2015 मध्ये इस्लामिक स्टेटने सिनाईमध्ये रशियन प्रवासी विमानाला लक्ष्य केले होते, ज्यामध्ये विमानातील सर्व 224 प्रवासी ठार झाले होते. यातील बहुतांश रशियन नागरिक इजिप्तमधून सुट्टीनंतर परतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT