Russian Military Plane Crash Dainik Gomantak
ग्लोबल

Russian Military Plane Crash: संपर्क तुटला अन् क्षणातच होत्याचं नव्हतं झालं! रशियाचं 'An-26' लष्करी विमान क्रिमियात कोसळलं; 29 जणांचा जागीच मृत्यू

An-26 Transport Aircraft Crash 29 Dead: रशियाचे 'An-26' हे लष्करी वाहतूक विमान क्रिमिया द्वीपकल्पावर कोसळले असून या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Russian Military Plane Crash : रशियातून एक धक्कादायक बातमी समोर आली. रशियाचे 'An-26' हे लष्करी वाहतूक विमान क्रिमिया द्वीपकल्पावर कोसळले असून या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 23 प्रवासी आणि 6 चालक दलाच्या सदस्यांचा समावेश असून या दुर्घटनेत दुर्दैवाने कोणीही जिवंत वाचू शकले नाही. या भीषण घटनेमुळे संपूर्ण रशियामध्ये शोककळा पसरली असून संरक्षण विभागाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.

हे विमान मंगळवारी (31 मार्च) स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता एका नियमित उड्डाणावर असताना अचानक रडारवरुन गायब झाले आणि त्यानंतर त्याचा जमिनीवरील तळाशी असलेला संपर्क तुटला. काही काळानंतर शोध पथकाला या विमानाचे अवशेष सापडले. धक्कादायक म्हणजे त्यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या दुर्घटनेचे सर्वात महत्त्वाचे आणि चर्चेत असलेले पैलू म्हणजे हे विमान रशियाने 2014 मध्ये युक्रेनकडून हस्तगत केले होते. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाने (Russia) जेव्हा क्रिमियावर ताबा मिळवला, तेव्हा युक्रेनच्या ताफ्यात असलेले हे 'An-26' विमान रशियन हवाई दलाने आपल्या ताब्यात घेतले होते.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या अपघाताबाबत स्पष्ट केले की, प्राथमिक तपासणीत विमानावर कोणत्याही 'बाह्य प्रभावाचे' संकेत मिळालेले नाहीत. याचा थेट अर्थ असा होतो की, युक्रेनकडून कोणतेही क्षेपणास्त्र डागले गेले नव्हते किंवा कोणत्याही ड्रोनचा हल्ला झाला नव्हता. तसेच पक्षी धडकल्यासारखे बाह्य घटकही या अपघाताला कारणीभूत ठरलेले नाहीत. रशियन लष्कराच्या प्राथमिक माहितीनुसार, ही संपूर्ण दुर्घटना केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाली असावी असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर 'An-26' हे दोन इंजिन असलेले टर्बोप्रॉप विमान आहे, जे प्रामुख्याने लष्करी रसद पुरवण्यासाठी आणि सैनिकांच्या वाहतुकीसाठी जगभरात वापरले जाते. या विमानाची एकूण क्षमता 40 सैनिकांना वाहून नेण्याची असून पॅराट्रूपर्सना युद्धभूमीवर तैनात करणे आणि जखमी सैनिकांना तातडीने बाहेर काढण्यासाठी याची विशेष रचना करण्यात आली होती. ब्लॅक सीच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात हे विमान आपले कार्य करत असतानाच ही मोठी दुर्घटना घडली. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या अपघाताच्या सखोल चौकशीसाठी एक उच्चस्तरीय लष्करी आयोग घटनास्थळी पाठवला असून विमानातील तांत्रिक बिघाडाचे नेमके स्वरुप काय होते, याचा तपास आता वेगाने केला जात आहे.

विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने कोणत्याही प्रकारचा संकटाचा संदेश (SOS) पाठवला होता का, याचाही शोध अधिकारी घेत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील सध्याच्या अत्यंत तणावपूर्ण वातावरणात क्रिमियासारख्या संवेदनशील भागात लष्करी विमान कोसळणे ही रशियासाठी मोठी हानी मानली जात आहे. विशेषतः ज्या विमानाला रशियाने युक्रेनकडून ताब्यात घेतले होते, त्याच विमानाचा अशा प्रकारे भीषण अंत होणे हा योगायोग सध्या चर्चेचा विषय ठरला.

सध्या रशियाचे बचाव पथक आणि लष्करी अधिकारी या अपघातातील मृतदेह बाहेर काढण्याचे आणि विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' शोधण्याचे काम करत आहेत, जेणेकरुन विमानाने अखेरचा संपर्क तोडण्यापूर्वी आकाशात नक्की काय घडले होते, हे सत्य जगासमोर येऊ शकेल. संपूर्ण देश सध्या या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या जवानांना आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

खरी कुजबुज: कोण कुणाला मतदान करतो?

VIDEO: पाकड्यांच्या क्रिकेटचा खेळखंडोबा! वाऱ्याच्या एका झटक्यानं पीचवरील कव्हर्स उडाले अन् ग्राऊंड्समनही तोंडावर पडले, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT