Research: This special cloth will eliminate the lack of oxygen in the body Dainik Gomantak
ग्लोबल

Research: शरीरातील ऑक्सीजनची कमतरता दूर करेल हा खास कापड

संशोधकांनी असा एक कापड बनवल आहे जो शरीरातील ऑक्सीजनची कमतरता दूर करू शकेल.

दैनिक गोमन्तक

शास्त्रज्ञांनी असे फॅब्रिक तयार केले आहे, जे शरीराच्या आकारानुसार ऑक्सीजनचा (Oxygen) पुरवठा करेल. यांचा फायदा गायक(Singer) , खेळाडू(Players) , डान्स (Dancers) यासारखे शारीरिक काम करणाऱ्या लोकाना होणार आहे. हा कापड शरीराच्या प्रकारानुसार आपल्याला ऑक्सीजनचा पुरवठा करेल. यामध्ये संकुचित आणि विस्तारीत करण्याची क्षमता आहे. शरीरात ऑक्सीजनची (Oxygen) कमतरता जाणवल्यास ऑक्सीजनचा पुरवठा करते.

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये हे विशेष फॅब्रिक तयार केले आहे. येथे संशोधकांनी पहिले एका फायबरचा शोध लावला, जो नंतर स्वीडनला जाऊन कपड्यात बदल करण्यात आला.या संशोधनात सहभाग घेतलेल्या संशोधकांचे म्हणणे आहे की हे कापड गायक, खेळाडू किंवा जे लोक मोठ्या आजारानंतर आणि शस्त्रक्रियेनंतर हे कापड परिधान करू शकतात. यामुळे त्यां लोकांना श्वसनाच्या समस्यापासून सुटका मिळेल. काही गायकांनी त्याचा वापर केला होता, ज्यामुळे त्यांना गाणे गाताना खुप मदत झाली. तर काही खेळाडूनी सांगितले की श्वास घेण्यास मदत होईल.

* त्वचेला कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही

हे फायबर बनवणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमचे सदस्य ओजगून किलिक यांनी माहिती दिली की, हा नवीन फायबर अतिशय पतला आहे. या कापडाचा वापर करणे सोपे आहे. हे केवळ मानवी त्वचेनुसार तयार केले जाते. यामुळे त्वचेला कोणतीही हानी होणार नाही. त्याचा बाह्य स्तर सामान्य पॉलिस्टरसारख्या मटेरियलपासून तयार करण्यात आला आहे.

* कामाचे स्वरूप

या फायबरला ओमानीफायबर असे नाव देण्यात आले आहे. हे अनेक स्तरांचे फायबर असून जे फ्लुडिक सिस्टमद्वारे काम करते. या फायबरपासून बनवलेले कपडे घातले की लगेच ही यंत्रणा कमाल लागते. या फायबरमध्ये सेन्सर आहेत जे फॅब्रिक किती आकुंचीत आणि विस्तारत आहे हे शोधतात. त्यानुसार, त्याच्या द्रवपदार्थ वाहिन्या ताबडतोब बाहेरील हवा खेचू लागतात आणि शरीराच्या त्वचेकडे निर्देशित करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT