Repercussion of Israel-Hamas war in America, three Palestinian students were shot dead. Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas युद्धाचे अमेरिकेत पडसाद, तीन पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांवर गोळीबार

Ashutosh Masgaunde

Repercussion of Israel-Hamas war in America, three Palestinian students were shot:

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ५० दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात १० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक जखमी झाले आहेत. या संघर्षात अमेरिकेने इस्रायलला उघडपणे पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, इतर देशांमध्येही द्वेषपूर्ण गुन्हे वाढत आहेत. अमेरिकेतील व्हरमाँट प्रांतातील बर्लिंग्टन शहरात तीन पॅलेस्टिनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

थँक्सगिव्हिंगसाठी बर्लिंग्टनमधील एका नातेवाईकाची भेट घेतल्यानंतर विद्यार्थी प्रॉस्पेक्ट स्ट्रीटवर चालत होते तेव्हा एका गोर्‍या नागरिकाने त्यांच्यावर त्याच्या हँडगनने गोळ्या झाडल्या.

वृत्तानुसार, पोलिसांनी रविवारी एक निवेदन जारी केले की, पीडितांमध्ये दोन अमेरिकन नागरिक आणि एक कायदेशीर रहिवासी आहे. गोळी लागल्यानंतर त्याला व्हरमाँट मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले.

"दोघांची प्रकृती स्थिर आहे, तर एकाला गंभीर दुखापत झाली आहे," असे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, “काहीही न बोलता आरोपीने पिस्तुलातून किमान चार गोळ्या झाडल्या आणि पायी पळून गेला.”

Three Palestinian students were shot in USA.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन विद्यार्थ्यांनी पारंपारिक पॅलेस्टिनी स्कार्फ 'केफियेह' घातला होता. बर्लिंग्टन पोलिसांनी गोळीबाराचे बॅलिस्टिक पुरावे गोळा केले आहेत, जे एका डेटाबेसमध्ये संग्रहित केले जातील.

एफबीआयने रविवारी सांगितले की, या घटनेची चौकशी करण्याची तयारी केली आहे. मात्र, गोळीबार करणाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या गुन्ह्याचा तपास पोलीस विभागाच्या प्राथमिक टप्प्यात आहे.

दरम्यान, इन्स्टिट्यूट फॉर मिडल इस्ट अंडरस्टँडिंगने एक निवेदन जारी केले आणि पीडितांची ओळख र्‍होड आयलंडमधील ब्राउन युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी हिशाम अवतानी, पेनसिल्व्हेनिया येथील हॅवरफोर्ड येथील विद्यार्थी किनान अब्दलहामीद आणि ट्रिनिटी कॉलेजमधील विद्यार्थी तहसीन अहमद अशी आहे.

गेल्या काही आठवड्यांत अमेरिकेत वाढलेल्या तणाव आणि द्वेषाच्या गुन्ह्यांमध्ये ही घटना घडली आहे. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर पहिला हल्ला केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले केले.

याआधी ऑक्टोबरमध्ये 6 वर्षीय पॅलेस्टिनी-अमेरिकन मुलाची एकाने भोसकून हत्या केली होती. अधिकाऱ्यांनी याला द्वेषपूर्ण गुन्हा म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT