Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Viral Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका मुलाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Manish Jadhav

Viral Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका मुलाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा मुलगा एका वेगवान नावेवर उभा राहून जबरदस्त डान्स करत आहे. त्याच्या 'बॅलन्स' आणि डान्स मूव्ह्स पाहून सगळेच थक्क झाले आहेत. त्याच्या या व्हिडिओमुळे तो आता सोशल मीडिया स्टार बनला असून जगभरात लोक त्याला 'कॉपी' करत आहेत. चला तर मग या अनोख्या मुलाविषयी जाणून घेऊया...

आधी हा व्हिडिओ पाहा!

इंडोनेशियातील 'पाकू जलूर' उत्सवातील व्हिडिओ

दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडिओ इंडोनेशियातील (Indonesia) असल्याचे सांगितले जात आहे. इंडोनेशियातील रियाउ प्रांतात होणाऱ्या पारंपरिक 'पाकू जलूर' नाव शर्यत उत्सवामध्ये या मुलाने एका रेसिंग बोटीच्या अगदी पुढच्या टोकावर उभे राहून शानदार डान्स केला. त्याचा हा व्हिडिओ क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये हा मुलगा काळ्या रंगाच्या पारंपरिक 'ते लुक बेलंगा' पोशाखात आणि मलय रियाउ हेडक्लॉथ परिधान केलेला, तसेच गॉगल लावून दिसत आहे. त्याच्या सहज आणि स्टायलिश डान्स मूव्ह्सने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.

कोण आहे हा 'ऑरा फार्मर' रेयान?

या मुलाबद्दल सांगायचे झाल्यास, त्याचे वय केवळ 11 वर्षे आहे. त्याचे नाव रेयान अर्कान ढिका (Rayyan Arkan Dhika) असून, तो इंडोनेशियामध्येच राहतो. सोशल मीडियावर लोक त्याला "ऑरा फार्मर" (Aura Farmer) या नावाने ओळखतात. रेयान इतका व्हायरल झाला की, नुकतीच बीबीसीने (BBC) त्याची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याने सांगितले की, "हा डान्स मी स्वतःच विचार करुन केला होता. माझ्यासाठी हे करणे खूप सोपे होते. आता माझे मित्र मला जेव्हाही पाहतात, तेव्हा म्हणतात, 'तू तर व्हायरल झाला आहेस.'"

'ऑरा फार्मर' आणि 'ऑरा फार्मिंग'चा ट्रेंड

दुसरीकडे, हा व्हिडिओ सर्वात आधी जानेवारी महिन्यात टिकटॉकवर @lensa_rams नावाच्या युझरने पोस्ट केला होता. त्यानंतर तो फेसबुक, इंस्टाग्राम (Instagram) आणि एक्स यांसारख्या प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल झाला होता. रेयानच्या शांत आणि आत्मविश्वासपूर्ण 'ऑरा'मुळेच त्याला "ऑरा फार्मर" हे नाव मिळाले. "ऑरा फार्मिंग" हा इंटरनेटवर एक नवीन ट्रेंड बनला आहे, ज्याचा अर्थ जास्त प्रयत्न न करता स्टाइल आणि करिष्मा पसरवणे असा होतो. रेयानने या ट्रेंडला एक नवीन ओळख दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Child Obesity: सावधान... राज्यातील मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतोय! पालकांचे दुर्लक्ष, अतिलाडपणा ठरतोय घातक; बालरोग तज्ञांनी दिला 'हा' सल्ला

Goa Politics: खरी कुजबुज; विधानसभेत कोकणीतून हवी चर्चा!

Rice Farming: शेतात भरली 'आजोबांची शाळा', 80 वर्षीय मनू कुंडईकरांकडून 77 विद्यार्थ्यांना 'भात लागवडी'चे धडे, शिक्षकवर्गही मदतीसाठी सरसावला

Goa Crime: मध्यरात्री 'ड्रग्ज'प्रकरणी युवकाला अटक, 228 ग्रॅम गांजासह स्कूटर-मोबाईल जप्त; शिरगावात कारवाई

Railway Rules Changed: रेल्वेचा मोठा निर्णय!तात्काळ बुकिंगचे नियम बदलले, OTP व्हेरिफिकेशन अनिवार्य; वाचा पूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT