Rahul Gandhi Dainik Gomantak
ग्लोबल

Rahul Gandhi: मोदींच्या राजवटीत सत्य पुसले जाऊ शकते... लोकसभेच्या कामकाजातून हटवलेल्या शब्दांवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Parliament Monsoon Session: संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणाने संसद गाजली.

Manish Jadhav

संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणाने संसद गाजली. राहुल यांनी आपल्या भाषणातून थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मात्र त्यानंतर राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग काढून टाकण्यात आला. यावर आता राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

त्यांनी असा दावा केला की, सत्य पुसून टाकता येत नाही, ते नेहमीच सत्य राहील. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपल्या भाषणातून हल्लाबोल केला होता. खरे तर, राहुल गांधी यांनी हिंदू, अग्निवीर, अल्पसंख्याक आणि हिंसाचाराशी संबंधित केलेल्या भाषणातील काही भाग लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला.

मंगळवारी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, 'मोदीजींच्या राजवटीत सत्य पुसले जाऊ शकते, पण प्रत्यक्षात सत्य पुसून टाकले जाऊ शकत नाही. मला जे काही बोलायचे होते ते मी बोललो, तेच सत्य आहे. ते लोकसभेच्या कामकाजातून माझ्या भाषणातील भाग हटवू शकतात पण ते सत्य पुसून टाकू शकत नाहीत.'

राहुल गांधींच्या भाषणादरम्यान सभागृहात गोंधळ

दरम्यान, राहुल गांधींच्या भाषणाला सत्ताधारी पक्षातून प्रचंड विरोध झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक संबोधल्याचा आरोप केला. हटवलेल्या भागांमध्ये हिंदू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप (BJP), आरएसएस, उद्योगपती अदानी, अंबानी आणि अग्निवीर योजना यांच्यावर केलेल्या टिप्पण्यांचे काही भागही काढून टाकण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त किमान पाच कॅबिनेट मंत्र्यांनी राहुल गांधींच्या विधानावर आक्षेप घेतला. त्यांचे भाषण 90 मिनिटांपेक्षा जास्त चालले. हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या आपल्या पहिल्या भाषणातून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जहरी टीका केली. राहुल यांचे भाषण त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांनी प्रेक्षक गॅलरीतून भाषण पाहिले आणि ऐकले.

संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी बोलत होते. प्रेषित मुहम्मद यांचा हवाला देत राहुल यांनी कुराण निर्भयतेबद्दल सांगते यावर भर दिला.

भगवान शिव, गुरु नानक आणि येशू ख्रिस्त यांची छायाचित्रे दाखवत राहुल गांधी यांनी निर्भयतेच्या महत्त्वावर भर दिला. भगवान शिवाचे गुण आणि गुरु नानक, येशू ख्रिस्त, बुद्ध आणि महावीर यांच्या शिकवणीचा दाखला देत ते म्हणाले की, सर्व धर्म आणि महान व्यक्तींनी “घाबरु नका” असेच सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू अखेर पोलिसांच्या ताब्यात! मोपा विमानतळावरून थेट वैद्यकीय तपासणीसाठी

SCROLL FOR NEXT