Queen Elizabeth II Funeral Dainik Gomantak
ग्लोबल

Queen Elizabeth II Funeral: महाराणी एलिझाबेथ यांच्यावर आज अंत्यसंस्कार, अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख लावणार हजेरी

Queen Elizabeth II Funeral: ब्रिटनवर 70 वर्ष राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

दैनिक गोमन्तक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांचे पार्थिव लंडनमधील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येईल. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि दिग्गज व्यक्ती हजेरी लावणार आहेत. महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूसुध्दा उपस्थित राहणार आहेत.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यानंतर मंगळवारी त्यांचे पार्थिव 13 सप्टेंबर रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांचं पार्थिव वेस्टमिन्स्टर हॉलला येथे अंत्यदर्शनासाठी (Queen Elizabeth II Funeral) ठेवण्यात आले होते.त्यांच्यावर आज 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रात्री 12 वाजता शाही कुटुंब महाराणीला कायमचा निरोप देणार असून महाराणी एलिझाबेथ यांना त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या शेजारील समाधीमध्ये दफन करण्यात येणार आहे.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.यादरम्यान त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष,पंतप्रधान लंडनला (Landon) पोहोचले आहेत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंतिम दर्शनासाठी लाखो लोक जमले होते. ही गर्दी आज आणखी वाढू शकते.

मीडिया रिपोर्टनुसार महाराणी एलिझाबेथ या अंत्यदर्शनासाठी आठ किलोमीटरहून अधिक लांब रांग लागली आहे. यामध्ये दर तासाला सुमारे 4000 लोक राणीचे अंतिम दर्शन घेत आहेत. राणीचे पार्थिव सध्या संसदेच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. आज त्यांचे पार्थिव येथून बाहेर काढल्यानंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू होणार असून नियोजित वेळापत्रकानुसार त्यांचा मृतदेह दफन करण्यात येईल.

अंत्यसंस्काराला अनेक राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला शेकडो राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे देखील उपस्थित राहणार आहेत. राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी ब्रिटनमध्ये अंत्यसंस्कार होणार असून, त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हेही एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.

या देशांना निमंत्रण मिळालेले नाही

पण हे सहा देश आहेत जे राणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नाहीत.

- रशिया

- म्यानमार

- बेलारूस

- सीरिया

- व्हेनेझुएला

- अफगाणिस्तान

आमंत्रण का पाठवले नाही?

खरे तर या प्रकरणी ब्रिटिश वृत्तपत्र द टेलिग्राफने आपल्या एका वृत्तात या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. अहवालानुसार, युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियाला निमंत्रण देण्यात आलेले नाही, असे ब्रिटनच्या राजनैतिक सूत्रांनी सांगितले. बेलारूस आणि म्यानमारने युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला पाठिंबा दिला असला तरी दोघांनाही निमंत्रण दिलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT