Sheikh Mohammed bin Abdulrahman Al Thani
Sheikh Mohammed bin Abdulrahman Al Thani 
ग्लोबल

कतारचा जगाला इशारा; तालिबानला वेगळे पाडल्यास अस्थिरता वाढेल

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे सरकार उलथवून लावत आपल्या सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर केला आहे. मात्र दुसरीकडे तालिबानच्या अफगाणिस्तानातील एन्ट्रीचा परिणाम शेजारील देशांबरोबर जागतिक पटलावर उमटू लागले आहेत. पाकिस्तान, चीन, सौदी अरेबिया सारखे देश तालिबान आपला पाठिंबा देत आहेत. त्यातच आता कतारने देखील जगाला इशारा दिला आहे.

कतारने जगाला चेतावणी देत म्हटले की, जर तालिबान वेगळे केले गेले तर जगात आणखी अस्थिरता वाढू शकते. त्यांनी जगभरातील देशांना अफगाणिस्तानमधील सुरक्षा आणि सामाजिक -आर्थिक चिंता दूर करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. कतारचे परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी (Sheikh Mohammed bin Abdulrahman Al Thani) यांनी दोहामध्ये या गोष्टींचा नामोउल्लेख केला आहे. यावेळी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हेइको मासही त्यांच्यासोबत होते.

परराष्ट्र मंत्र्यांनी पुढे म्हटले की, 'जर आपण तालिबानवर अटी घालण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याबरोबर असणारी भागीदारी थांबवली, तर आम्ही एक रिक्त जागा सोडत आहोत. आणि यातच ती जागा कोण भरुन काढेल?' तालिबान आणि अमेरिका (Qatar Taliban Connection) यांच्यात चर्चा आयोजित करणे आवश्यक आहे. याशिवाय तालिबानचे राजकीय कार्यालयही कतारमध्ये आहे. 15 ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतल्यापासून जगातील कोणत्याही देशाने तालिबानला अफगाणिस्तानमधील सरकार म्हणून अद्याप मान्यता दिलेली नाही.

कतारने दहशतवादाबद्दल इशाराही दिला

पाश्चिमात्य देश म्हणतात की, तालिबान्यांनी सर्वसमावेशक सरकार बनवावे आणि मानवी हक्कांचा आदर करावा. शेख मोहम्मद म्हणाले की, तालिबानला सरकार म्हणून मान्यता देणे ही प्राथमिकता नाही (Qatar Taliban Connection). ते पुढे म्हणाले, 'आमचा विश्वास आहे की तालिबानशी संबंध प्रस्थापित केल्याशिवाय सुरक्षा आघाडीवर किंवा सामाजिक-आर्थिक आघाडीवर पोहोचू शकणार नाही.' तसेच अस्थिरतेच्या वाढीविरुद्ध इशारा देत सर्वसमावेशक सरकारची मागणी यावेळी केली आहे.

सर्व पक्षांचा समावेश करुन सरकार स्थापन करण्याचा आग्रह

अल थानी म्हणाले, "आम्ही नेहमीच त्यांना (तालिबान) सर्वसमावेशक सरकार बनवण्याचा आग्रह केला आहे. ज्यात देशातील सर्व पक्षांचा समावेश असावा. आणि देशातील कोणताही पक्ष या सर्सवसमावेश सरकारच्या बाहेर असू नये." तालिबानशी आम्ही केलेल्या चर्चेदरम्यानही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची नकारात्मक किंवा सकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी जर्मन परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, त्यांना तालिबानशी वाटाघाटी करण्याचा मार्ग दिसत नाही. "व्यक्तिशः माझा असा विश्वास आहे की, तालिबानशी वाटाघाटी करण्याचा कोणताही मार्ग नाही कारण अफगाणिस्तानातील अस्थिरता आम्ही पूर्णपणे सहन करु शकत नाही," ज्यामुळे दहशतवादाला मदत होईल आणि शेजारच्या देशांवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

Donation: उल्‍हास वेर्लेकर कुटुंबियांकडून गोव्‍यातील दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाखाची देणगी

Chhattisgarh: छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 12 नक्षलवादी ठार!

Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा झटका; कोर्टाने लैंगिक छळाचे आरोप केले निश्चित

Valpoi Hegdewar High School: डॉ. हेडगेवार हायस्कूलला विश्वजीत राणेंकडून दोन कोटींची देणगी जाहीर

SCROLL FOR NEXT