Protest In Parliament | Brazil Protest Dainik Gomantak
ग्लोबल

Protest In Parliament: 'या' देशाच्या संसदेत घुसले 3000 आंदोलक; अमेरिकेने व्यक्त केली नाराजी

Brazil Latest News: ब्राझीलची राजधानी ब्राझिलियामध्ये रविवारी बोल्सेनारो समर्थकांनी संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात गोंधळ घातला.

दैनिक गोमन्तक

Brazil Protest: ब्राझीलमध्ये दिवसेंदिवस स्थिती बिघडत चालली आहे. यातच आता, ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी संसद भवनात गोंधळ घातला आहे. त्यानंतर त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. शेकडो आंदोलकांना अटक करण्यात आली, मात्र असे असतानाही सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनात घुसून समर्थकांनी धुडघुस घातला.

ब्राझीलची राजधानी ब्राझिलियामध्ये रविवारी बोल्सेनारो समर्थकांनी संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात गोंधळ घातला. सुमारे तीन हजार लोकांचा जमाव संसद परिसराबाहेर जमला आणि त्यानंतर त्यांनी बॅरिकेड तोडून संकुलात प्रवेश केला.

शेकडो आंदोलकांना अटक

विशेष म्हणजे, बोल्सेनारो समर्थकांच्या बॅरिकेड तोडण्याच्या घटनेनंतरच मोठा पोलिस फौजफाटा संसदेच्या संकुलात पोहोचला. पोलिसांनी (Police) आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि त्यांचा पाठलाग सुरु केला. यावेळी शेकडो आंदोलकांना अटकही करण्यात आली.

या घटनेवर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली

ब्राझीलमधील या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ब्राझीलमधील लोकशाहीवरील हल्ल्याचा मी निषेध करतो, असे बायडन म्हणाले. आम्ही ब्राझीलच्या लोकशाही संस्थांना पूर्ण पाठिंबा देतो आणि ब्राझीलच्या लोकांच्या इच्छेला कमी लेखता येणार नाही. मी राष्ट्राध्यक्ष सिल्वासोबत काम करत राहण्यास उत्सुक आहे, असेही बायडन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबईतही सुरु होणार गोव्यासारखी पायलट सेवा! रिक्षा-टॅक्सीला पर्याय, दर खिशाला परवडणारा; माहिती घ्या

Mandrem: 'पर्यटन खाते लाखोंचे टेंडर देते, पैसा जातो कुठे'? कचऱ्यात बुडाले मांद्रेचे किनारे; स्थानिकांत संतापाची लाट

Goa Taxi: कर्नाटकातील ‘गोझो कॅब्स’ टॅक्सी गोव्यात? टॅक्‍सीमालकचा आरोप; कठोर कारवाईची मागणी

Horoscope: प्रेम व्यक्त करण्यासाठी 'योग्य' दिवस! वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी 'या' वेळी प्रपोज केल्यास होणार फायदा

Missing Womens: 2 ज्येष्ठ महिला अचानक बेपत्ता! मये भागात खळबळ; संशयास्पद ठिकाणी शोधमोहीम सुरु

SCROLL FOR NEXT