Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Political Crisis: 'कदाचित हे माझे शेवटचे ट्विट...', इम्रान खान vs PAK सरकार यांच्यातील संघर्षाचा उडाला भडका!

Imran Khan: पाकिस्तानचे माजी इम्रान खान यांनी बुधवारी दावा केला की, पोलिसांनी त्यांच्या घराला चारही बाजूंनी वेढा घातला आहे.

Manish Jadhav

Pakistan Political Crisis: पाकिस्तानातील राजकीय अनागोंदी संपायचं नाव घेत नाही. इम्रान खान यांच्या गळ्याभोवती पाकिस्तानी सरकार आणि लष्कर फास आवळतच चालला आहे.

यातच आता, पाकिस्तानचे माजी इम्रान खान यांनी बुधवारी दावा केला की, पोलिसांनी त्यांच्या घराला चारही बाजूंनी वेढा घातला आहे.

आपल्याला पुन्हा एकदा कधीही अटक होऊ शकते. त्यांनी पुढे ट्विट करत म्हटले की, ''पुढील अटकेपूर्वी कदाचितच माझे हे शेवटचे ट्विट. पोलिसांनी माझ्या घराला वेढा घातला आहे.''

दरम्यान, इम्रान खान (Imran Khan) यांनी "लंडन प्लॅन" बद्दल सांगितल्यानंतर आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली सरकार त्यांना 10 वर्षे तुरुंगात टाकण्याची योजना आखत असल्याच्या दोन दिवसांनी हे घडले आहे. त्यांची पत्नी बुशरा बेगम यांनाही तुरुंगात पाठवण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोमवारी एका ट्विटमध्ये इम्रान खान म्हणाले होते की, ''जेव्हा मी तुरुंगात होतो, तेव्हा अधिकाऱ्यांनी न्यायाधीश, ज्युरी आणि जल्लादाची भूमिका बजावली होती. आता बुशरा बेगमला तुरुंगात टाकून मला देशद्रोहाच्या कायद्यातर्गंत पुढची दहा वर्षे तुरुंगात ठेवण्याची योजना आहे.''

इम्रान यांनी पुढे असा दावा केला की, त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर अधिकारी पीटीआय नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करतील. आणि शेवटी ते पाकिस्तानातील (Pakistan) सर्वात मोठ्या पक्षावर बंदी घालतील. (ज्या प्रकारे त्यांनी पूर्व पाकिस्तानात अवामी लीगवर बंदी घातली).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT