Taiwan Club Photos Leak Dainik Gomantak
ग्लोबल

Taiwan Club Photos Leak: श्रीमंतांचा शौकच निराळा! तैवानमध्ये डिनर सर्व्ह करण्याचा धक्कादायक प्रकार समोर; वाचा नेमकं प्रकरण?

तैवानमधील एका खाजगी क्लबमध्ये डिनर सर्व्ह करण्याचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

Manish Jadhav

तैवानमधील एका खाजगी क्लबमध्ये डिनर सर्व्ह करण्याचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. जिथे महिलांच्या नग्न शरीराचा वापर फूड प्लेट्स म्हणून करण्यात आला (Food served on Woman Naked Body). या कामासाठी मॉडेल्सना हायर केले गेले.

क्लबने या डिनरला ‘न्योताइमोरी डिनर’असे नाव दिले आहे. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी खास शेफला देखील हायर करण्यात आले. या डिनरची किंमत प्रति व्यक्ती सुमारे अडीच लाख रुपये ठेवण्यात आली. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस येताच स्थानिक अधिकाऱ्यांनी क्लबविरोधात चौकशी सुरु केली.

हाँगकाँगचे इंग्रजी वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने या संदर्भात एक रिपोर्ट तयार केला आहे. वादग्रस्त क्लब तैवानचा आहे. ताइचुंग या किनारी शहरामध्ये असलेल्या या क्लबमध्ये 'न्योताईमोरी' डिनर नावाचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता.

असा आरोप आहे की, सुशी आणि साशिमी नावाचे पदार्थ देण्यासाठी तरुण मुलींचा प्लेट म्हणून वापर केला. देशातील धनाढ्यांनी या प्रोग्रामला हजेरी लावली.

फोटो लीक

दरम्यान, क्लबचे काही फोटो ऑनलाइन लीक झाले. रिपोर्टनुसार, येथे एका मुलीचे शरीर फुलांनी सजवण्यात आले होते आणि तिला पूर्णपणे नग्न अवस्थेत टेबलावर झोपवले होते. मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर खाद्यपदार्थ ठेवले होते. या डिनरची किंमत अंदाजे 2.5 लाख रुपये प्रति व्यक्ती होती. यामध्ये डिनरचे किंमत आणि मॉडेलचे शुल्क समाविष्ट होते.

ईटी टुडेच्या रिपोर्टनुसार, मॉडेल्सचे काम सुमारे दोन तास होते. बॉडी पेंटिंग आणि फूड सर्व्हिंगचे काम त्यांना करायचे होते. या प्रोग्राममध्ये 20 हून अधिक लोक सहभागी झाल्याची माहिती आहे.

मॉडेल्सना हायर केले

आयोजकांनी सर्व्हर म्हणून काम करण्यासाठी स्थानिक तैवान मॉडेल्सना हायर केले होते. ग्राहकांसाठी सुशी आणि साशिमी तयार करण्यासाठी प्रोफेशनल शेफ आणले गेले. दरम्यान, या घटनेचा पर्दाफाश करणारी व्यक्ती ग्राहक होती की कर्मचारी याबाबत माहिती मिळालेली नाही.

हे प्रकरण उघडकीस येताच सोशल मीडियावर (Social Media) एकच हल्लकल्लोळ उडाला. त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला. ताइचुंग सिटी हेल्थ ब्युरोने सांगितले की, त्यांना या प्रकरणाशी संबंधित कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, परंतु आम्ही प्रकरणाची दखल घेतली आहे.

ही जपानी परंपरा आहे!

'न्योताईमोरी' परंपरेची सुरुवात जपानमध्ये (Japan) झाली. त्याचा ट्रेंड 1980 च्या दशकात वाढला. त्यावेळी पुरुषांच्या शरीरावर खाद्यपदार्थ दिले जात होते, त्यास 'नानटॅमोरी' म्हणतात. 2022 मध्ये S2O तैवान सॉन्गक्रान म्युझिक फेस्टिव्हलमध्ये न्योताईमोरी फूडचाही समावेश होता.

सर्वात महागड्या पॅकेजची किंमत सुमारे 25 लाख रुपये होती. सार्वजनिक आरोग्यविषयक चिंता आणि नैतिक समस्यांचा हवाला देत चीन सरकारने 2005 मध्ये न्योताईमोरीवर बंदी घातली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT