Principle In Karachi Raped 45 Women Dainik Gomantak
ग्लोबल

ब्लॅकमेल करत 45 महिलांवर बलात्कार, महिला शिक्षिकेच्या साथीने मुख्याध्यापकाचा विकृत प्रकार

Ashutosh Masgaunde

Principle In Pakistans Karachi Raped 45 Women With The Help Of Female Teacher:

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कराची शहरात, स्थानिक पोलिसांनी एका शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक केली आहे, ज्यावर 45 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

इरफान गफूर मेमन असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या पीडितांमध्ये बहुतांश शाळेतीलच महिला कर्मचारी होत्या. येथे महिला शिक्षकांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.

पाकिस्तानातील प्रसिद्ध वृत्तपत्र डॉन ने दिलेल्या बातमीनुसार, कराचीच्या शाळेच्या मुख्याध्यापक इरफानवर ४५ महिलांवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी मुख्याध्यापकाने ४५ महिलांवर अनेकदा बलात्कार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

यावेळी आरोपी बलात्काराची घटना छुप्या कॅमेऱ्यात चित्रित करायचा आणि त्यानंतर या फूटेजचा वापर करत तो महिलांना ब्लॅकमेल करून सतत बलात्कार करायचा.

'डॉन न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मोबाइलवरून त्याने खोलीत छुपे कॅमेरे ठेवल्याचे समोर आले आहे. तो बलात्काराच्या घटनांचे व्हिडिओ बनवायचा आणि नंतर महिलांना ब्लॅकमेल करून आपली वासना पूर्ण करायचा. पोलिसांनी आरोपी इरफानच्या मोबाइलमधून काही महिलांचे अश्लील व्हिडिओही जप्त केले आहेत.

ही शाळा कराचीच्या गुलशन-ए-हदीद भागात आहे, जिथे आरोपी इरफान हा मुख्याध्यापक होता. ही कराचीतील प्रसिद्ध शाळांपैकी एक आहे.

इंटरनेटवर महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी ४५ महिलांवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आणली. तपासादरम्यान या सर्व महिला एकेकाळी कराचीतील या शाळेत काम करत असल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे, आरोपी इरफानची कडक चौकशी केल्यानंतर हे आक्षेपार्ह व्हिडिओ शाळेत कार्यरत असलेल्या एका महिला शिक्षिकेने इंटरनेटवर अपलोड केल्याचे उघड झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या शाळेत महिला शिक्षकांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.

सध्या आरोपी इरफानला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध बलात्कार, ब्लॅकमेलिंग, धमकावणे आदी कलमे दाखल करण्यात आली आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी मुख्याध्यापक महिला शिक्षिकांचे व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करायचा. शाळेचे सर्व डीव्हीआरही आम्ही ताब्यात घेतले आहेत. सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे तपासासाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT