"आमचाही तेवढाच हक्क," पाकिस्तान करणार 'INDIA' वर दावा

Pakistan: काहीजन अनेक वर्षांपासून असा युक्तिवाद करत आहेत की, पाकिस्तानलाही ‘INDIA’ नावावर अधिकार आहे कारण त्यामध्ये सिंधू प्रदेशाचा संदर्भ आहे.
Pakistan Will Claim On 'India' Name If Modi Government Changes It Officially.
Pakistan Will Claim On 'India' Name If Modi Government Changes It Officially.Dainik Gomantak

Pakistan Will Claim On 'India' Name If Modi Government Changes It Officially:

केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकार देशाचे नाव पूर्णपणे बदलून INDIA चे भारत असे करणार आहे, अशा चर्चा देशभरात सुरू झाल्या आहेत.

कारण दिल्लीत रविवारी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या जागतिक नेत्यांना डिनरसाठी पाठवलेल्या निमंत्रण पत्रात 'President Of India' ऐवजी 'President Of Bharat' हे वाक्य वापरले आहे.

अशात जर भारताने INDIA नाव संविधानातून वगळले तर पाकिस्तान यावर दावा करु शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. काही पाकिस्तानींच्या मते, "सिंधू प्रदेशात राहत असल्यामुळे आमचाही INDIA नावावर तेवढाच हक्क आहे."

यावर काँग्रेससह जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे, दक्षिण आशियाबद्दलच्या घडोमोडींची माहिती देणाऱ्या South Asia Index या ट्विटर हॅंडलने दावा केला आहे की, जर मोदी सरकारने भारत हे नाव अधिकृतपणे स्वीकारल्यास पाकिस्तान 'इंडिया' नावावर आपला दावा सांगू शकतो.

इंग्रजांनी अविभाजित भारताला ‘INDIA’ हे नाव दिले होते असा युक्तिवाद केला जात आहे. भारताने ‘INDIA’ हे नाव सोडले तर साहजिकच पाकिस्तान या नावावर दावा करेल.

South Asia Index ने केलेल्या ट्विटनुसार, "भारताने संयुक्त राष्ट्र स्तरावर अधिकृतपणे नाव बदलल्यास पाकिस्तान ‘INDIA’ नावावर दावा करू शकतो. पाकिस्तानमधील काहीजन अनेक वर्षांपासून असा युक्तिवाद करत आहेत की, पाकिस्तानलाही ‘INDIA’ नावावर अधिकार आहे कारण त्यामध्ये सिंधू प्रदेशाचा संदर्भ आहे.

Pakistan Will Claim On 'India' Name If Modi Government Changes It Officially.
कॉंग्रेसने खरचं राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचा चुकीचा फोटो शेअर केला? वाचा काय आहे सत्य

South Asia Index च्या या ट्विटमध्ये पुढे असा दावा करण्यात आला आहे की, भारतीय उजव्या विचारसरणीच्या लोकांना ‘INDIA’ नावाचा तिरस्कार केला आहे.

दरम्यान, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी असा दावा केला की, देशाचे मूळ नाव निर्विवादपणे भारत आहे आणि ब्रिटिशांनीच त्याला ‘INDIA’ म्हणण्यास सुरुवात केली.

‘INDIA’ हे नाव ब्रिटीशांच्या काळात देण्यात आले होते, भारत सुमारे 200 वर्षे ब्रिटीशांचा गुलाम होता. प्रदीर्घ लढ्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तान वेगळा देश बनला.

Pakistan Will Claim On 'India' Name If Modi Government Changes It Officially.
प्रियकरासाठी नवऱ्यासह 3 चिमुकल्यांना सोडले, बायकोच्या शोधात चौथ्या पतीची वणवण

विशेष म्हणजे, संविधानात ‘INDIA’ आणि भारत हे दोन्ही शब्द वापरण्याची परवानगी आहे. याला सुप्रीम कोर्टानेही काही वर्षांपूर्वी दुजोरा दिला आहे.

केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकार आता फक्त भारत ठेऊन संविधानातून ‘INDIA’ हा शब्द काढून टाकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यावरून विरोधक जिथे आक्रमक झाले आहेत, त्यामुळे शेजारी देश पाकिस्तानमधूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com