Sri Lanka
Sri Lanka Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Emergency: राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी मध्यरात्रीपासून आणीबाणी केली जाहीर

दैनिक गोमन्तक

Emergency In Sri Lanka: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आज रात्रीपासून आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी ही घोषणा केली आहे. श्रीलंकेतील (Sri Lanka) प्रमुख विरोधी पक्षाने नुकताच सरकार आणि राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. (President Gotabaya Rajapaksa declared a state of emergency in Sri Lanka from midnight)

दरम्यान, विरोधी पक्षांनी आरोप केला की, 'जेव्हा देश सर्वात वाईट आर्थिक स्थितीतून जात आहे, तेव्हा राजपक्षे यांनी त्यांच्या घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत.' मुख्य विरोधी पक्ष, समगी जना बालवेगया (SJB) ने SLPP युती सरकारच्या विरोधात दोन अविश्वास प्रस्ताव संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धन यांच्याकडे सादर केले.

तसेच, गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला सत्तेतून काढून टाकण्यासाठी 225 सदस्यांच्या संसदेत (Parliament) बहुमत आवश्यक आहे. युनायटेड पीपल्स फोर्सकडे 54 मते आहेत. त्यांना छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. सत्ताधारी पक्षाकडे सुमारे दीडशे मते आहेत, मात्र आर्थिक संकटाच्या काळात ही संख्या कमी झाल्याने काही नेते पक्षाच्या विरोधात जाण्याची भीती आहे.

दरम्यान, राजपक्षे यांच्या आधी सिरीसेना राष्ट्राध्यक्ष होते. या महिन्याच्या सुरुवातीला सुमारे 40 खासदारांसह पक्षांतर करण्यापूर्वी ते सत्ताधारी पक्षाचे खासदार होते. श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेने (Sri Lanka) परकीय कर्जाची परतफेड स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे. या वर्षी $7 अब्ज विदेशी कर्ज आणि 2026 पर्यंत $25 अब्ज श्रीलंकेला भरावे लागणार आहेत. त्यांचा परकीय चलनाचा साठा एक अब्ज डॉलरच्या खाली आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT