Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानला चीनकडून झटका! डोस्कच धरुन बसले 'शाहबाज', 72 तासात...

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानात जनता बेहाल झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानात जनता बेहाल झाली आहे. यातच आता एका पाकिस्तानी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, येत्या 72 तासांत पाकिस्तानला 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे. हे कर्ज चीनमधील एका बॅकेचे आहे. यामुळे परकीय चलनाचा साठा चार अब्ज डॉलरच्या खाली जाईल.

यासोबतच, अद्याप कोणत्याही नवीन मदतीची माहिती मिळालेली नाही. अर्थ मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, चीनमधील (China) एका व्यावसायिक बँकेला $300 दशलक्ष कर्जाची परतफेड करायची आहे. चिनी बँकेच्या कर्जाची परतफेड केल्यानंतर, या आठवड्याच्या अखेरीस देशाचा परकीय चलन साठा $3.5 अब्जवर पोहोचेल.

पुढचे 72 तास पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचे आहेत

येत्या पाच दिवसांत पाकिस्तानला (Pakistan) तीन अब्ज डॉलर्सचे विदेशी कर्ज फेडायचे आहे, असे स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. मात्र, सेंट्रल बँकेचे गव्हर्नर जमील अहमद यांनी केलेले वक्तव्य काहीसे आशादायक आहे.

अहमद यांनी सांगितले की, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत $15 अब्ज कर्जाची परतफेड केली जाईल. यामुळे देशाला सध्या गरिबीपासून वाचवले आहे. आता देशाला तीन अब्ज डॉलर्सचे विदेशी कर्ज फेडायचे आहे. या आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीतही हे लक्ष्य गाठले जाईल. पण पुढचे 72 तास पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचे आहेत.

अर्थमंत्री इशाक दार कतारला रवाना

या सगळ्या दरम्यान देशाचे अर्थमंत्री इशाक दार कतारला रवाना झाले आहेत. धोरणात्मक विक्रीमध्ये आखाती देशांचे हित जाणून घेणे हा त्यांचा उद्देश आहे. निधी उभारण्यासाठी सार्वजनिक उद्योगांचे शेअर्सही विकले गेले आहेत. सरकारी संस्थांची किंमत काय असेल हे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी अद्याप ठरवलेले नाही. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कतार आणि संयुक्त अरब अमिरातीसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही कोणताही परिणाम होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Leopard Attack: सत्तरीत वन्यप्राण्यांची दहशत! बिबट्याच्या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Kalamba Devi Sathpurush Divjotsav: डिचोली येथील कळंबा देवीच्या मंदिरात दिवजोत्सव साजरा

Goa Crime: केरळचा पर्यटक गोव्यात आला अन्...! पणजीतील लॉजमध्ये आढळला मृतदेह; पोलीस तपास सुरू

गावातली जागा हेरून, साधे नेपथ्य - वादक बसवून 'कार्निव्हल'मध्ये रंगणाऱ्या लघुनाटीका! गोव्याची समृद्ध नाट्यपरंपरा 'जमनीवेले खेळ'

Gautam Gambhir IPL Offer: सीईओ, मेंटॉर अन् पार्टनर... गौतम गंभीर टीम इंडियाचं हेड कोच पद सोडणार? 'या' IPL टीमकडून मोठी ऑफर!

SCROLL FOR NEXT