Justin Trudeau Dainik Gomantak
ग्लोबल

जस्टिन ट्रूडो यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घातल्या गोळ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Canada News: कॅनडातील क्यूबेकमधील एका व्यक्तीला पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना धमकी दिल्याने प्रांतीय पोलिसांनी गोळ्या घातल्या.

Manish Jadhav

Canada News: कॅनडातील क्यूबेकमधील एका व्यक्तीला पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना धमकी दिल्याने प्रांतीय पोलिसांनी गोळ्या घातल्या. या व्यक्तीने क्यूबेकचे प्रीमियर फ्रँकोइस लेगॉल्ट यांना धमक्या दिल्याचाही संशय आहे.

क्यूबेकचे पोलिस वॉचडॉग, ब्यूरो डेस एन्क्वेट्स इंडिपेंडंट्स (बीईआय) ने सांगितले की, मॉन्ट्रियलच्या पूर्वेला सुमारे 180 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्कॉटटाउनमध्ये बुधवारी पहाटे गोळीबार झाला. हा युवक जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

काय झालं?

बीईआयच्या म्हणण्यानुसार, एका पोलीस (Police) अधिकाऱ्याने त्याच्या घराच्या खिडकीतून त्या व्यक्तीवर गोळी झाडली जेव्हा त्याने आरोपीला अधिकारी आत येत असलेल्या दरवाजाकडे बंदूक दाखवत असल्याचे पाहिले.

संशयिताने यापूर्वी लेगॉल्ट आणि ट्रूडो या दोघांनाही धमक्या दिल्या होत्या, परंतु संशयित व्यक्तीबद्दल अधिक तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. लेगॉल्ट यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांना या प्रकरणाची माहिती आहे.

निवेदनात पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की, निर्वाचित प्रतिनिधींच्या विरोधात धमक्या अस्वीकार्य असून त्याचा निषेध केला पाहिजे.

हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवर ट्रुडो यांचं वक्तव्य

दुसरीकडे, कॅनडात (Canada) खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरुन भारतविरोधात वक्तव्य केल्याने ट्रुडो यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले.

जस्टिन ट्रुडो म्हणाले होते..

"भारत सरकारने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आम्ही चिथावणी देण्याचा किंवा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत नाही," असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. दुसरीकडे, भारत सरकारने याआधीच कॅनडा (Canada) सरकारचे आरोप मूर्खपणाचे ठरवून फेटाळून लावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT