POK Leaders Appeal To India For Help Dainik Gomantak
ग्लोबल

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

POK Leaders Appeal To India For Help: पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र असंतोष आणि अशांतता पसरली असून, हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत.

Manish Jadhav

POK Leaders Appeal To India For Help: पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का देणारे वृत्त समोर आले. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र असंतोष आणि अशांतता पसरली असून, हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. आता या आंदोलकांनी थेट भारत सरकार आणि भारतीय लष्कराकडे मदतीचा हात मागितला. पीओकेमधील स्थानिक नेत्यांनी भारत सरकारला जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि डोडा सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LoC) खुली करण्याचे आवाहन केले, जेणेकरुन तिथले त्रस्त नागरिक भारतात येऊ शकतील. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

वास्तविक, पाकव्याप्त काश्मीरमधील जनता पाकिस्तानी लष्कर आणि तिथल्या सरकारच्या अनन्वित अत्याचाराला पूर्णपणे कंटाळली. त्यामुळेच त्यांनी पाक सरकारला चेतावणी दिली की, त्यांच्याकडे आता भारताचा दुसरा पर्याय उपलब्ध असून त्यांनी त्या दृष्टीने तयारी सुरु केली. पीओकेमध्ये सुरु असलेल्या या हिंसक निदर्शनांमध्ये आतापर्यंत हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. पाकिस्तानचे हुकूमशाही लष्कर निष्पाप नागरिकांवर कहर करत आहे. याच कारणास्तव पीओकेमध्ये आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या 'जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी'चे नेते सरदार अमन खान यांनी भारताकडे अधिकृतरित्या मदत मागितली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अमन खान हे पाकिस्तानला इशारा देताना आणि भारताकडे मानवीय मदतीची मागणी करताना दिसत आहेत. त्यांचा दावा आहे की, पाक सरकारने या भागाची आर्थिक नाकेबंदी केली असून लष्कर आंदोलकांवर अमानुष कारवाई करत आहे. पीओकेमध्ये अन्नधान्य, पाणी आणि जीवनावश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून तिथे गंभीर मानवी संकट उभे राहिले आहे. रावलकोट येथील ईदगाह मैदानावर जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना अमन खान यांनी जेव्हा विचारले की, "आपण नियंत्रण रेषेच्या (LoC) दिशेने कूच करायचे का?", तेव्हा संपूर्ण गर्दीने 'हो' म्हणत एकच जल्लोष केला.

गेल्या महिन्याभरापासून पीओकेमध्ये पाकिस्तान सरकार आणि सैन्याविरोधात घोषणाबाजी सुरु आहे. "पीओके हा पाकिस्तानचा (Pakistan) भाग नाही, आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे," अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला. येथील स्थानिक जनता आणि पाकिस्तानी प्रशासन यांच्यातील अविश्वास आता शिगेला पोहोचला, कारण तिथले प्रशासन पूर्णपणे लष्कराच्या तालावर नाचत आहे. पाकिस्तानच्या या दडपशाहीमुळे संतप्त झालेल्या पीओकेच्या नागरिकांना आता केवळ भारताचाच आशेचा किरण दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT