पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (PM Shehbaz Sharif) व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या भेटीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. उझबेकिस्तान येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या प्रमुखांची भेट झाली. या दरम्यान शाहबाज शरीफ यांचा हेडफोन पडला आणि हेडफोन सावरताना शरीफ यांचा गोंधळ उडाला हे सगळे पाहून पुतिन यांना हसू आवरले आहे.
बैठकी दरम्यान सुरुवातीला हेडफोन ठीक करण्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी वेळ घेतला, त्यानंतर त्यांनी एका अधिकाऱ्याची मदत घेतली. यादरम्यान पुतिन हेडफोन लावून वाट पाहत राहिले. मात्र, बैठक सुरू होणार तेवढ्यात शाहबाज शरीफ यांच्या कानावरून हेडफोन पडला. हेडफोन आवरताना शरीफ यांचा चांगलाच गोंधळ उडाला. हे सगळं पाहून पुतीन यांना आपले हास्य आवरता आले नाही.
या घटनेनंतर सोशल मीडियावर शाहबाज शरीफ यांच्यावर टीका केली जात आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने हा क्षण देशासाठी ‘लज्जास्पद’ असल्याचा म्हटले आहे.
तसेच, शाहबाज शरीफ यांच्या भेटीवरही टीका होत आहे. ज्यामध्ये रूसचे अधिकारी हातात कागद पेन घेऊन बैठकीच्या नोट्स बनवत बसले आहेत, तर पाकिस्तानी अधिकारी रिकाम्या हाताने बसल्याचे दिसून येते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.