Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
ग्लोबल

भारत शांतीदूत! युक्रेन भेटीतून मोदींच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे दर्शन, भारताकडे साऱ्या जगाचे लक्ष

PM Modi Ukraine Visit: गेल्या तीन दशकात युक्रेनला भेट देणारे नरेंद्र मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

Pramod Yadav

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येणाऱ्या भारताकडे देखील जगाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे.

रशिया - युक्रेन यांच्यातील युद्धाला जवळपास दोन वर्षे पूर्ण होत असताना उभय देशांमध्ये शांतता संवादाबाबत चर्चा होताना दिसत नाही. अशात मोदींनी युक्रेनला दिलेली भेट जागतिक पटलावर चर्चेचा विषय ठरला असून, मोदींची ओळख शांतीदूत अशी झाली आहे.

गेल्या तीन दशकात युक्रेनला भेट देणारे नरेंद्र मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. विशेषत: रशिया युक्रेन यांच्या युद्ध सुरु असताना मोदींची युक्रेनला भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. मोदींची भेट दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

मोदींचा जागतिक स्तरावर शांतीदूत म्हणून उदय होत आहे. भारतात जी२० परिषदेचे आयोजन असो किंवा रशियानंतर युक्रेनला दिलेली भेट असो मोदी जागतिक स्तरावर योग्य पद्धतीने पत्ते टाकत असल्याचे जाणकार सागंतात.

राजनैतिक मुत्सद्देगिरी

भारताचे रशिया आणि युक्रेनसोबत मैत्रिपूर्ण संबंध आहेत. रशिया तर शीतयुद्ध काळापासून भारताचा मित्र आहे. रशिया गेल्या अनेक दशकांपासून भारताला मोठ्या प्रमाणात संरक्षण क्षेत्रातील साहित्याचा पुरवठा करतो.

तर, सोव्हिएत युनियनमधून स्वतंत्र झाल्यानंतर युक्रेनशी देखील भारताचे जवळचे संबंध आहेत. संरक्षण क्षेत्र असो शिक्षण किंवा शेती या क्षेत्रात युक्रेन भारत यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध आहेत.

अमेरिकेच्या नेतृत्वात रशियाविरोधात भूमिका घेण्यासाठी विविध देशांवर दबाव होता. यात भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता भारताने दोन्ही देशांसोबत शांतता संवादाला प्राधान्य दिले. यामुळे भारताला सॅक्शनच्या काळात देखील रशियाकडून कच्चा तेलाची खरेदी सुरु ठेवता आली.

मोदींची युक्रेन भेट शांतता संवादच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते. दोन्ही देशात मोदींचे झालेले स्वागत त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढलेल्या महत्वाचे प्रतिक आहे.

पप्पांनी युद्ध थांबवले

युक्रेन दौऱ्यावरुन मोदी परत आल्यानंतर सोशल मिडियावर पाप ने वॉर रुकवा दी, अशा कमेंट व्हायरल व्हायला लागल्या आहेत. अनेक मोदींच्या राजनैतिक मुत्सद्देगिरीचे कौतुक केले आहे. मोदी खरच जागतिक स्तरावरील नेते आहेत. आणि भारताची शांतीदूत अशी ओळख मजबूत झाल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले.

धोरणात्मक स्वातंत्र्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीबाबत महत्वाची बाब म्हणजे धोरणात्मक स्वातंत्र्य राखण्याची त्यांची क्षमता. रशियाशी भारताचे घनिष्ठ संबंध आणि आर्थिक गुंतवणुकी असूनही, मोदी अमेरिकेच्या गुड बुक्समध्ये राहण्यात यशस्वी झाले आहेत.

सध्याचे भू-राजकीय वातावरण लक्षात घेता ही संतुलन साधणे काही साधी बाब नाही. मोदींच्या मुत्सद्देगिरीने भारताला पूर्व विरुद्ध पश्चिम या द्विपक्षीय संघर्षात न अडकता आपले सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय हित जोपासण्याची मुभा दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhuipal: रात्री येत होता घरी, जबरदस्ती गाडीत बसवण्याचा केला प्रयत्न; 12 वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा डाव फसला

Water Supply Revenue: पाणी गळती, नादुरुस्त मीटर्स! सरकारला 5 कोटींचा फटका; नासाडी थांबवण्यासाठी एजन्सीची नेमणूक

Aldona: संतापजनक! हळदोण्यात पाळीव कुत्र्याच्या जबड्यावर झाडली गोळी; स्थानिकांची कारवाईची मागणी

Raibandar Fire News: रायबंदरमध्ये आगीचे थैमान! 2 दुचाकी, 4 कार जाळून खाक; लाखोंचे नुकसान

Verca Fire News: वार्का 2 स्कूटरींक उजो, Video

SCROLL FOR NEXT