PM Modi| Tokyo| PM Shinzo Abe Twitter
ग्लोबल

PM मोदींनी माजी पंतप्रधान शिंजो आबेंच्या अंत्यसंस्काराला लावली हजेरी, पाहा व्हिडीओ

PM Modi Meets Fumio Kishida: द्विपक्षीय बैठकीदरम्यान मोदी आणि जपानचे फुमियो किशिदा यांच्यात दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी चर्चा झाली.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी टोकियोला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींनी जपानचे विद्यमान पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली. द्विपक्षीय बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा शिंजो आबे यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. टोकियो येथे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला पंतप्रधान मोदी हजर होते.

पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishido) यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी जपान-भारत संबंध सुधारले. हे नातेही त्यांनी मोठ्या प्रमाणावर आणि अनेक क्षेत्रात विस्तारले आहे.

* पीएम मोदींनी शोक व्यक्त केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि जपानमधील संबंधांनी जगभरात प्रभाव निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पंतप्रधान किशिदा यांच्याशी झालेल्या संभाषणात आत्मविश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की, तुमच्या नेतृत्वामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील. जगभरातील समस्यांवर उपाय शोधण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावण्यास समर्थ असणार आहे. पीएम मोदी म्हणाले की, या दु:खाच्या काळात आम्ही भेटत आहोत. शेवटच्या वेळी मी आलो तेव्हा शिंजो आबे यांच्याशी बराच वेळ बोललो होतो.

पीएम मोदी आणि किशिदा यांची भेट

टोकियोमधील द्विपक्षीय बैठकीदरम्यान, दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यात चर्चा झाली. यासोबतच दोन्ही नेत्यांनी अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांनी भारत-जपान धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आणखी मजबूत करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्या शासकीय अंत्यसंस्कारासाठी 20 सरकार प्रमुखांसह 100 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 8 जुलै रोजी एका कार्यक्रमात सहभागी होत असताना शिंजो आबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी जपानहून मायदेशी रवाना होतील आणि मध्यरात्रीनंतर ते दिल्लीला पोहोचतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT