Petrol Diesel Prices | Crude Oil Price Crash  Dainik Gomantak
ग्लोबल

Crude Oil Price Crash: पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी स्वस्त होणार? कच्च्या तेलाच्या किंमती नीचांकी पातळीवर

ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत प्रती बॅरेल 4 टक्के घसरण

Akshay Nirmale

Crude Oil Price Crash: जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेली क्रेडिट सुईस बँक बुडालाच्या वृत्तादरम्यानच कच्च्या तेलाच्या किंमतीत सुमारे 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. अमेरिकन तेलात 5 टक्क्यांहून अधिक घसरण होत आहे आणि मध्य पूर्व (आखाती देशातील) तेलाच्या किंमतीतही सुमारे 5 टक्क्यांनी घसरण होत आहे.

त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती दीड वर्षातील नीचांकी पातळीवर आल्या आहेत. यासोबतच भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये कच्च्या तेलात जवळपास 6 टक्क्यांनी घसरण होत आहे. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे यंदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 रुपयांनी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्थिक क्षेत्रातील भूकंपाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरही दिसून येत आहे. ब्लूमबर्ग कमोडिटीनुसार, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत 5 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूड प्रति बॅरल सुमारे 4 डॉलरने कमी होऊन 73.62 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.

ज्याचा दर प्रति बॅरल 72 डॉलरच्या खाली जाण्याची शक्यता दिसत आहे. त्याच वेळी, अमेरिकन ऑइल डब्ल्यूटीआयच्या किंमतीत 5.26 टक्क्यांची घसरण झाली आहे आणि किंमत प्रति बॅरल 3.63 डॉलरने कमी होऊन प्रति बॅरल 67.70 डॉलर वर आली आहे. दोन्ही कच्च्या तेलाच्या किमती डिसेंबर 2021 च्या खालच्या पातळीवर आल्या आहेत.

भारताच्या वायदा बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 6 टक्क्यांची घसरण झाली असून, किंमत 346 रुपयांनी कमी होऊन 5,637 रुपये प्रति बॅरलवर आली आहे. ट्रेडिंग सत्रात कच्च्या तेलाचा भाव 5,617 रुपयांवर गेला होता.

तसे, वायदा बाजारात कच्चे तेल 5,968 रुपयांवर उघडले होते. तज्ञांच्या मते, कच्चे तेल 5,500 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता दिसत आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरण होऊ शकते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट होऊ शकते. सरकार आणि तेल बाजार कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे इंधनाच्या दरात लिटरमागे 15 रुपयांची कपात केली जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि धोकादायक परिणाम

Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

Viral Video: 'आता घरी चल, मग बघतेच...!' चालत्या बाईकवर बायकोची नवऱ्याला बुक्क्यांनी मारहाण; रोमँटिक गाण्यासह व्हिडिओ व्हायरल

कोवळ्या मुला – मुलींच्या तस्करीचा डाव उधळला; गोव्याकडे येणाऱ्या 13 जणांची वास्को – द – गामा ट्रेनमधून सुटका

Diwali Goa Trip: 10 हजारांच्या बजेटमध्ये गोवा दर्शन! दिवाळीत 'नरकासूर दहन' आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद 3 रात्री/ 4 दिवसांत घ्या, अशी करा ट्रिप प्लॅन

SCROLL FOR NEXT