Pakistan Karachi Viral News Dainik Gomantak
ग्लोबल

कोंबडीला दिला हिरवा रंग अन् पोपट म्हणून OLX वर विकला, लोक म्हणाले हाच खरा बिझनेसमॅन

पाकिस्तानमधील एका पठ्याने जुगाडू डोकं चालवत स्वस्त किमतीचा पोपट म्हणून चक्क कोंबडी एकाला विकली आहे.

Pramod Yadav

Pakistan Karachi Viral News: ऑनलाईनवर खरेदी विक्रीचे व्यवहार व्हायला लागल्यापासून अनेक ऑनलाईन शॉपींग वेबसाईट आणि विविध कंपन्यांचे ऊत आले आहे. बऱ्याचवेळा ऑनलाईन शॉपींगमधून फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अथवा मागवले होते एक आणि मिळाले भलतेच अशा घटना देखील वारंवार घडल्याचे उघड झाले आहे.

पण, पाकिस्तानमधील एका पठ्याने जुगाडू डोकं चालवत स्वस्त किमतीचा पोपट म्हणून चक्क कोंबडी एकाला विकली आहे.

पाकिस्तानच्या कराची शहरातील ही घटना आहे. येथील एका व्यक्तीने चक्क घरातील कोंबडीला हिरवा रंग दिला आणि तो कोंबडी पोपट म्हणून ऑनलाईन खरेदी विक्री प्लॅटफॉर्म असलेल्या OLX वरती त्याची विक्री केली. विशेष म्हणजे या कोंबडीला आणि कथित पोपटाला 6,500 हजार एवढे पैसे मिळाले आहेत.

एवढेच नव्हे तर याच व्यक्तीने त्याच्या प्रोफाईवर आमच्याकडे सर्व प्रकारचे पक्षी स्वस्त दरात उपलब्ध आहेत अशी माहिती दिली आहे. दरम्यान, या व्यक्तीच्या जुगाडू डोक्याची आणि कल्पनेबाबत अश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोक काय म्हणाले?

दरम्यान, या घटनेबाबत दिवा मॅगझिन पाकिस्तान या इन्स्टाग्राम पेजवरून फोटो आणि माहिती शेअर करण्यात आली आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांना हा पोपट खेरदी करणारा वेडा आहे का? असा प्रश्न करत आहेत.

अनेकांनी या पोस्टवर कमेन्ट करताना पोपट म्हणून कोंबडी खरेदी करणारा स्वस्त नशा करतो का? त्याला ती कोंबडी आहे हे दिसत नाही का? असा प्रश्न केला आहे. तर, एकाने हा विक्रेता खराखुरा बिझनेसमॅन आहे अशी कमेन्ट केली आहे. सध्या ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून, लोक विविध पद्धतीने यावर व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT