Asim Munir Dainik Gomantak
ग्लोबल

Asim Munir Assassination: मोसादकडून असीम मुनीरच्या हत्येचा कट? ब्राझीलच्या पत्रकाराचा खळबळजनक दावा; पाकिस्तानने म्हटले 'बकवास'

Mossad Plot Asim Munir Assassination Claim: इस्त्रायलची गुप्तहेर संघटना 'मोसाद' पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा एक खळबळजनक दावा ब्राझीलच्या एका पत्रकाराने केला.

Manish Jadhav

Mossad Plot Asim Munir Assassination Claim: इस्त्रायलची गुप्तहेर संघटना 'मोसाद' पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा एक खळबळजनक दावा ब्राझीलच्या एका पत्रकाराने केला. या दाव्यानुसार, असीम मुनीर आणि पाकिस्तानी शिष्टमंडळ जेव्हा अमेरिका-इराण शांतता चर्चेसाठी स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर होते, तेव्हा हा हल्ला केला जाणार होता.

वास्तविक, पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने अमेरिका आणि इराण यांच्यात स्वित्झर्लंडमधील बुर्गेनस्टॉक रिसॉर्ट येथे पहिल्या फेरीची चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान पाकिस्तान (Pakistan) आणि कतारचे शिष्टमंडळही तेथे उपस्थित होते. याच दौऱ्याचा फायदा घेऊन मोसाद घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याचा दावा समोर आला.

हा धक्कादायक दावा प्रसिद्ध पत्रकार पेपे एस्कोबार यांनी राजकीय विश्लेषक मारिओ नवल यांच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना केला. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, एस्कोबार यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराला अत्यंत विश्वासार्ह आणि ठोस माहिती मिळाली होती की इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या थेट आदेशावरुन मोसाद, असीम मुनीर आणि स्वित्झर्लंडला जाणाऱ्या संपूर्ण पाकिस्तानी शिष्टमंडळावर जीवघेणा हल्ला करण्याच्या तयारीत होते.

पत्रकाराने पुढे असाही दावा केला की, या कथित कटाची माहिती मिळताच पाकिस्तानने ओमान देशाच्या मध्यस्थीने इस्त्रायलला अत्यंत कडक आणि गंभीर इशारा दिला होता. इस्लामाबादने इस्त्रायलला पाठवलेल्या संदेशात स्पष्ट म्हटले होते की, जर तुम्ही आमच्या शिष्टमंडळाला हात लावण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तुम्हाला जगाच्या नकाशावरुन मिटवून टाकू.

दरम्यान, हा खळबळजनक दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तात्काळ फेटाळून लावला. 'एआरवाय न्यूज'चे अध्यक्ष कामरान खान यांच्या मते, एका उच्चपदस्थ पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्याने हा दावा 'पूर्णपणे खोटा' असल्याचे म्हटले. या अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर यांचा संपूर्ण स्वित्झर्लंड दौरा ठरलेल्या नियोजनानुसार अतिशय सुरळीत पार पडला.

या दौऱ्यादरम्यान कोणत्याही क्षणी स्विस किंवा अमेरिकन सुरक्षा पथकांकडून कोणताही सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला नव्हता. तसेच सुरक्षेबाबत कोणतीही चिंताही व्यक्त केली गेली नव्हती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडवून देणारा हा दावा केवळ एक अफवा असल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT