NO Sleep Dainik Gomantak
ग्लोबल

रात्रीला उशीरा झोपताय मग मृत्यूला लवकर आमंत्रण देताय; अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रात्री जागे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये तंबाखू आणि मद्य सेवनाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

Pramod Yadav

रात्री उशीरापर्यंत जागून किरकोळ झोप घेणाऱ्या लोकांचे प्रमाण अलिकडे वाढत आहे. पण, अशा लोकांची खऱ्या अर्थाने झोप उडवणारी एक माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे.

रात्री उशीरा झोपणाऱ्या लोकांचा मृत्यू लवकर होतो असे नव्या अभ्यासातून समोर आले आहे. यातून निर्माण होणाऱ्या सवयी मुख्यत्वे व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात असेही अभ्यासातून समोर आले आहे.

रात्री जागे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये तंबाखू आणि मद्य सेवनाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. असेही या अभ्यासातून दिसून आले आहे.

क्रोनोबायोलॉजी इंटरनॅशनल जर्नलमध्ये शुक्रवारी प्रकाशित झालेला हा अभ्यास 2002 फिनिश ट्विन कोहॉर्टच्या वतीने करण्यात आला आहे. या अभ्यासात 1981 ते 2018 पर्यंतच्या सुमारे 24,000 जुळ्या मुलांची माहिती गोळा करण्यात आली आहे. या अभ्यासातून त्यांच्या आरोग्याशी संबंधित वर्तणूक आणि रोगाची कारणे शोधून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अभ्यासात प्रत्येक जुळ्या मुलाला सकाळ आणि संध्याकाळ याबाबत तो अधिक जागा किंवा झोपी गेलेला असतो याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यातून एकच पर्याय त्यांनी निवडण्यास सांगितले.

जवळपास 33 टक्के लोकांनी ते उशीरापर्यंत जागे असतात असे सांगितले, तर 29 टक्के लोकांनी सकाळी लवकर उठतात असे सांगितले. माहिती गोळा केल्यानंतर आकेडवारी पाहिली असता रात्री उशीरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांच्या मृत्यूच्या प्रमाणात 9 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच, या लोकांमध्ये मद्य, धुम्रपान, शरिराचे वजन वाढणे आणि झोपेची वेळ कमी होणे यांचा समावेश असल्याचे दिसून आले.

रात्री उशीरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांमध्ये जुनाट आजार होण्याचा धोका अधिक असू शकतो. रात्री बसून राहण्यामुळे एरोबिक फिटएरोबिक फिटनेस पातळी कमी झाली तसेच, त्यांची चरबी देखील कमी बर्न झाली. असे अभ्यासातून दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: विजयाचा नवा सुवर्ण इतिहास! अफगाणिस्तानचा 300 धावांनी उडवला धुव्वा, टीम इंडियाने मोडले 5 मोठे रेकॉर्ड्स

Guru Shukra Yuti 2026: दारिद्र्य संपणार, श्रीमंती येणार! 10 जूनपासून खुला होणार कुबेराचा खजिना; शुक्र-गुरुची युती 3 राशींना बनवणार मालामाल

प्रत्येक पंचायतीला 10 हजार रोपं लावण्याचं टार्गेट! सरकारी आदेशानंतर गोव्यातील गावागावांत जागेसाठी धावपळ; वृक्षारोपणानं समोर आणलं वास्तव

Indian Population: "भारताचा जन्मदर सातत्याने घटतोय..." एलॉन मस्कच्या 'त्या' पोस्टने उडवली खळबळ

FIFA World Cup: मेस्सी एकदा जिंकला...आता रोनाल्डोही जिंकावा

SCROLL FOR NEXT